WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू ... 90 टक्के लोकांना माहितीच नाही
HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित… जाणून घ्या किंमत
काहीवेळा लोकं राऊटर चुकीच्या ठिकाणी लावतात तर वायफाय राऊटरजवळ काही चुकीच्या वस्तू ठेवल्या जातात, ज्यामुळे वायफायची स्पीड कमी होते. घरात असे अनेक गॅझेट्स वापरले जातात, ज्याचा परिणाम वायफाय इंटरनेट स्पीडवर होतो आणि इंटरनेट स्पीड कमी होते. वायफायच्या इंटरनेट स्पीडवर कोणत्या वस्तूंचा परिणाम होतो आणि वायफायपासून कोणत्या वस्तू दूर ठेवाव्या, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
वायफाय राऊटर 2.4 GHz फ्रीक्वेंसीवर ऑपरेट केला जातो. या फ्रीक्वेंसीवर चालणारे दुसरे डिव्हाईस सिग्नलमध्ये अडथळे आणतात, ज्यामुळे इंटरनेट स्पीड कमी होते. वायफाय राऊटरजवळ सिक्योरिटी कॅमेरा लावला असेल कर सिग्नलमध्ये अडथळे येऊ शकतात. याप्रमाणे स्मार्ट टिव्ही देखील राऊटरमधून निघणारे सिग्नल कमकुवत करतात. जर तुमचा टिव्ही हा स्पीकर किंवा साउंडबारने जोडला जात असेल तर सिग्लमध्ये अडथळे येऊ शकतात. जर तुम्ही स्मार्ट होम हब वापरत असाल, तर त्याचाही वायफायच्या वेगावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्य असल्यास वायफाय राऊटरपासून सिक्योरिटी कॅमेरा, स्मार्ट टिव्ही, स्मार्ट होम हब, दूर ठेवा.
जे राऊटर 2.4 GHz बँडचा वापर करतात, त्यांच्या इंटरनेट स्पीडमध्ये समस्या येऊ शकतात. मॉडर्न राऊटरमध्ये 5 GHz आणि 6 GHz बँडचा सपोर्ट ऑफर केला जातो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही काही डिव्हाईस या बँड्सवर जोडू शकता. पण जर तुम्हाला कोणताही खर्च न करता इंटरनेट स्पीड सुधारायची असेल तर तुम्ही सिक्योरिटी कॅमेरा, स्मार्ट टिव्ही, स्मार्ट होम हबसारख्या वस्तू वायफाय राऊटरपासून दूर ठेऊ शकता. वस्तू जितक्या लांब असतील सिग्नलमध्ये येणारे अडथळे तितके कमी होतील. तसेच सिक्योरिटी कॅमेरे वायरने कनेक्ट करून देखील तुम्ही वायफाय इंटरनेट सिग्नलमध्ये येणारे अडथळे थांबवू शकता. तुमच्या स्मार्ट टीव्हीला इथरनेट केबलने जोडणे हा त्रास टाळण्याचा एक सोपा मार्ग आहे. यामुळे तुमच्या वायफाय स्पीडवर परिणाम होणार नाही.
वायफाय राऊटर दुसऱ्या ब्लूटूथ डिव्हाईसपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे सिग्नलमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट देखील ऑफर केला जाईल. राउटर नेहमी मध्यभागी ठेवावा, जेणेकरून सिग्नल घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये सहज पोहोचेल. राउटर फर्निचर आणि इतर वस्तूंपेक्षा उंच ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा.






