World Backup Day: तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर
डिजीटल डेटा हरवणं ही केवळ टेक्निकल समस्या नाही, तर यामुळे अनेकांचे प्रोफेशनल नुकसान देखील होऊ शकतं. तुम्ही बॅकअप घेतले नसेल तर तुमचे महत्त्वाचे प्रोजेक्ट, तुमच्या आठवणी सर्वकाही एकाच झटक्यात संपू शकते. ड्राइव फेल होणं, वायरस अटॅक, रॅनसमवेयर आणि चुकून फाईल्स डिलीट होणं यांसारख्या कारणांमुळे देखील अशा समस्या निर्माण होऊ शकतात. डेटा बॅकअपची सुरुवात नेहमी मुख्य डिव्हाईसपासून करा. मॅक यूजर्ससाठी डिस्क यूटिलिटी आधीपासूनच उपलब्ध आहे. लिनक्स यूजर्स स्मार्ट कंट्रोलचा वापर करू शकतात. मात्र, ही टूल्स तुमची प्रणाली नेहमी सुरक्षित राहील याची कोणतीही हमी नाही. यासाठीच तुमच्या महत्त्वाच्या फाईल्सचे बॅकअप घेणं अत्यंत गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला बॅकअप घेण्याची सुरुवात करायची असेल तकर तुम्ही एक एक्सटर्नल हार्ड ड्राइव खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या डेटाची कॉपी सेव्ह करू शकता. सीगेट आणि वेस्टर्न डिजिटल सारखे ब्रँड़्स अतिशय चांगले आणि टिकाऊ स्टोरेज डिव्हाईस बनवतात. पण तुम्ही जर केवळ हार्ड ड्राइव खरेदी केले तर चालणार नाही. पण रोज बॅकअप घेणं देखील तितकेच गरजेचे आहे. नेहमी तुमच्या संगणकाच्या स्टोरेज क्षमतेपेक्षा दोन ते तीन पट जास्त क्षमतेची हार्ड ड्राइव्ह खरेदी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला भविष्यातील स्टोरेजची कमतरता टाळण्यास मदत होईल आणि जुना डेटा सहजपणे जतन करता येईल.
अनेकदा असं होतं की, तुम्ही नियमित बॅकअप घेणं विसरता. या समस्येवरील उपाय म्हणजे ऑटोमॅटिक बॅकअप सिस्टिम. मॅक यूजर्ससाठी टाइम मशीन सर्वात उत्तम टूल आहे. ज्याच्या मदतीने रोज बॅकअप घेतले जाऊ शकते. विंडोज यूजर्ससाठी विंडोज बॅकअप आणि फाइल हिस्ट्रीसारखे ऑप्शन्स उपलब्ध आहे. थर्ड-पार्टी सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमची ही कामं अगदी सहज पूर्ण केली जाऊ शकते. ऑटोमॅटिक बॅकअपचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, तुम्हाला ते पुन्हा पुन्हा लक्षात ठेवण्याची गरज नाही आणि तुमचा डेटा कायम सुरक्षित राहतो.
केवळ लोकल बॅकअप म्हणजेच हार्ड ड्राइववर अवलंबून राहणं गरजेचं नाही. तुमचे डिव्हाइस चोरीला गेल्यास, आगीत पडल्यास किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास, तुमचा स्थानिक बॅकअप देखील नष्ट होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही स्टोअर केलेले क्लाऊड बॅकअप तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. ब्लॅकब्लेज सारखे प्लॅटफॉर्म्स तुमचा डेटा इंटरनेटवर सुरक्षित सर्वर स्टोअर करते. गूगल ड्राइव, आइक्लाउड सारखे ऑप्शन्स देखील उपलब्ध असणार आहेत.






