Tech Tips: iPhone च्या Flash Light Blink ने हैराण झालात? चुटकीसरशी करा बंद, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
Smartphone Tips: फोनची स्क्रीन पाहून डोळे दुखतात? लगेच बदला या सेटिंग्ज; डोळ्यांना मिळेल आराम
आयफोनमध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर कॅमेऱ्याच्या जवळील एलईडी फ्लॅश सतत चमकू लागते. या फीचरमुळे यूजर्स प्रचंड हैराण होतात. तुम्ही देखील अशाच यूजर्सपैकी आहात का? तर चिंता करू नका. आयफोन सेटिंगमध्ये छोटासा बदल करून तुम्ही ही समस्या सोडवू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – AI Created)
आयफोनमध्ये प्लॅश फॉर अलर्ट एक्सेसिबिलिटी फीचर असते. ज्या यूजर्सना नोटिफिकेशनचा आवाज ऐकू जात नाही किंवा जे यूजर्स सतत कामात व्यस्त असतात अशा यूजर्सना नोटिफिकेशन आल्यानंतर अलर्ट करण्याचा या फीचरचा उद्देश आहे. या फीचरमध्ये आयफोनमध्ये जेव्हाही कोणते नोटिफिकेशन येते किंवा कॉल येतो, अशावेळी कॅमेऱ्याच्या जवळ असलेली एलईडी लाईट वारंवार ब्लिंक होते. मात्र यामुळे यूजर्सच्या कामात व्यत्यय येऊ शकते आणि यूजर्स हैराण होतात.
अनेकदा यूजर्स चुकून आयफोनमध्ये हे फीचर ऑन करतात. यानंतर प्रत्येक नोटिफिकेशनसाठी जेव्हा प्लॅश लाईट चमकू लागते, तेव्हा यूजर्स ही फ्लॅश बंद करण्यासाठी नोटिफिकेशन सेटिंग शोधू लागतात. पण हा पर्याय नोटिफिकेशन सेटिंगमध्ये उपलब्ध नसतो. हे फीचर बंद करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.






