Oppo A5 5G स्मार्टफोन भारतात लाँच, डॅमेज प्रूफ बॉडी आणि बायोमेट्रिक सिक्योरिटीने सुसज्ज... किंमत 17 हजारांहून कमी
तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा किंवा तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टेक कंपनी Oppo ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नवा स्मार्टफोन Oppo A5 5G या नावाने भारतात लाँच करण्यात आला आहे.
भारत लवकरच बनणार Apple चा मॅन्युफॅक्चरिंग हब, देशातील या ठिकाणी सुरु होणार नवा प्लँट!
Oppo A5 5G स्मार्टफोन अनेक तगड्या फीचर्स आणि दमदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी आहे. त्यामुळे ज्यांना नवीन बजेट स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या स्मार्टफोनची किंमत 17 हजार रुपयांहून कमी आहे. तसेच स्मार्टफोनच्या खरेदीवर ऑफर्स आणि डिस्काऊंटचा लाभ घेण्याची देखील संधी मिळू शकते. स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Oppo A5 5G स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6 जीबी +128 जीबी आणि 8 जीबी +128 जीबी यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅमची किंमत 15,499 रुपये आहे, तर 8 जीबी रॅमवाल्या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ओप्पो इंडियाच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन ऑरोरा ग्रीन आणि मिस्ट व्हाइट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला आहे.
Meet the all-new OPPO A5 5G — now available in two powerful variants: 6GB + 128GB at ₹15,499 and 8GB + 128GB at ₹16,999.
Grab yours now https://t.co/EqoHkHzegN pic.twitter.com/ZeKySEopww— OPPO India (@OPPOIndia) June 20, 2025
Oppo ने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 1604 x 720 पिक्सेल रेजॉलूशनसह 6.67 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेट आणि 1000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास 7i देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 जीबीपर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबीचे UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन 8 जीबीपर्यंतच्या वर्चुअल रॅमला देखील सपोर्ट करते.
स्मार्टफोनमध्ये डाइमेंसिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Oppo A5 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सेलच्या मुख्य लेंससह एक 2 मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये बॅटरी 6000mAh देण्यात आली आहे. जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की, फोन 37 मिनटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. फोन डॅमेज प्रूफ 360 डिग्री आर्मर बॉडीसह लाँच करण्यात आला आहे.
Vi युजर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने केली कमाल, नेटवर्कशिवाय करता येणार व्हिडीओ आणि ऑडियो कॉल्स
या फोनमध्ये युजर्सना 6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासह अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. फोन मिलिट्री ग्रेड ड्यूरेबिलिटीसह येतो. यामध्ये बायोमेट्रिक सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित ColorOS 15 वर काम करतो. हा ओप्पो फोन IP65 डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट रेटिंगसह येतो.