भारत लवकरच बनणार Apple चा मॅन्युफॅक्चरिंग हब, देशातील या ठिकाणी सुरु होणार नवा प्लँट!
भारतात आता Apple ची उपस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे. भारत लवकरच Apple चा मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखला जाणार आहे. यासाठी कंपनीने तयारी देखील सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती की बंगळुरुमध्ये Apple चं एक नवीन युनिट तयार केलं जात आहे. यासाठी कंपनीने तयारी देखील सुरु केली आहे. या युनिटसोबतच आता कंपनी भारतात एक नवीन प्लँट देखील सुरु करणार आहे. हा नवीन प्लँट तमिळनाडूमध्ये सुरु केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कंपनी भारतातील आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहे.
Vi युजर्ससाठी आनंदाची बातमी! कंपनीने केली कमाल, नेटवर्कशिवाय करता येणार व्हिडीओ आणि ऑडियो कॉल्स
Apple चे मुख्य मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर Foxconn ने भारतात आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तैवानी कंपनी भारतात iPhone चे एन्क्लोजर म्हणजेच बाह्य रचना किंवा बॉडी केसचे उत्पादन सुरू करणार आहे, असं सांगितलं जात आहे. सध्या भारतात केवळ Tata Electronics च iPhone चे एन्क्लोजर तयार करत आहे. Foxconn चा मुख्य फोकस पूर्णपणे iPhone च्या असेंबलीवर होता. मात्र आता फॉक्सकॉन देखील एन्क्लोजर तयार करण्यास सुरुवात करणार आहे. ज्यामुळे आता Apple भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. यासाठी वेगाने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, Foxconn ने तमिळनाडुच्या Oragadam स्थित ESR Industrial Park मध्ये एक नवीन युनिट बनवण्याचं काम सुरु केलं आहे. या प्लँटमध्ये iPhone चे एन्क्लोजर (बॉडी) तयार केले जाणार आहेत. हा प्लँट फॉक्सकॉनच्या बांधकामाधीन असलेल्या दुसऱ्या प्लँटजवळ असेल, ज्यामध्ये आयफोन डिस्प्ले मॉड्यूल बनवले जातील. Foxconn सध्या श्रीपेरंबुदुरमध्ये iPhone ची असेंबली करते. मात्र एन्क्लोजर तयार करण्याच्या योजनेमुळे आता Foxconn त्यांची स्थानिक उत्पादन क्षमता वाढवणार आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की Foxconn ने घेतलेला हा निर्णयामुळे Apple च्या धोरणाचा एक भाग आहे. यामध्ये चीनप्रमाणेच भारतात वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे पुरवठादार तयार करू इच्छिते.
Foxconn ने तमिळनाडुशिवाय बंगळुरुजवळील देवनहल्ली येथे एक मोठे युनिट तयार केले आहे. येथून iPhone ची शिपिंग जून 2025 पासून सुरु केली जाण्याची शक्यता आहे. तसेच हैदराबादमध्ये Foxconn एअरपॉड्सच्या असेंब्लीसाठी एक नवीन प्लँट सुरु करण्याची योजना आखत आहे.