Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल

ओप्पो के 15 प्रो सीरीजमध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट देण्यात आले आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य शूटर लावला आहे. हे स्मार्टफोन्स ओप्पो चाईनाच्या ऑनलाईन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 07, 2026 | 11:26 AM
गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल

गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल

Follow Us
Follow Us:
  • ओप्पो के 15 प्रो प्लस मध्ये 8000mAh बॅटरी आणि 100W सुपरवुक फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
  • फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे.
  • दोन्ही मॉडेल्स मीडियाटेक डेमेन्सिटी चिपसेटसह गेमिंग परफॉर्मन्ससाठी डिझाइन करण्यात आले आहेत
टेक कंपनी ओप्पोने अलीकडेच Oppo K15 Pro+, Oppo K15 Pro आणि Oppo Watch X3 हे तीन डिव्हाईस चीनमध्ये लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन्स विशेषत: गेमर्ससाठी लाँच करण्यात आले आहेत. नव्या K15 सीरीजमधील स्मार्टफोन मॉडेल्स थर्मल मॅनेजमेंटसाठी कंपनीच्या नेक्स्ट जनरेशन एक्टिव कूलिंग फॅनने सुसज्ज आहेत. ओप्पो के 15 प्रो प्लस तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे, तर ओप्पो के 15 प्रो चार कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. ओप्पो के 15 प्रो प्लस स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 9000 सीरीज चिपसेटने सुसज्ज आहे.

कोणी किती वेळा पाहिली तुमची स्टोरी? सर्व काही समजणार एका क्लिकवर, इंस्टाग्रामचं नवं फीचर बदलणार यूजर्सचा अनुभव

ओप्पो के 15 प्रो सिरीजची किंमत आणि उपलब्धता

ओप्पो के 15 प्रो प्लस स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये आणि स्टँडर्ड व्हेरिअंटची किंमत CNY 3,699 म्हणजेच सुमारे 50,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिव्हाईसच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,199 म्हणजेच सुमारे 57,000 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)

ओप्पो के 15 प्रो च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 41,000 रुपये आणि स्टँडर्ड व्हेरिअंटची किंमत CNY 3,199 म्हणजेच सुमारे 43,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ओप्पो के 15 प्रो प्लस साइबर विंग्स, ओरिजिन ग्रे, आणि फोटोडस्ट या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे (ही चिनी नावांची भाषांतरे आहेत). दुसरीकडे, ओप्पो के 15 प्रो हा साइबर विंग, गोल्डन लीजेंड, ओरिजिन ग्रे, आणि रेडिएंट डस्ट या चार रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जातो.

ओप्पो के 15 प्रो सीरीजचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

ओप्पो के 15 प्रो प्लस आणि ओप्पो के 15 प्रो हे दोन्ही ड्युअल सिम हँडसेट ओप्पोच्या अँड्रॉईड 16-बेस्ड ColorOS 16 वर चालतात. ओप्पो के 15 प्रो प्लसमध्ये 6.78-इंच फुल एचडी प्लस (1,272×2,772 पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या या डिस्प्लेमध्ये 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 450 पीपीआयची पिक्सेल डेंसिटी, 1.07 बिलियन रंग, 330Hz चा टच सँपलिंग रेट आणि 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. तर, ओप्पो के 15 प्रो मध्ये 6.59-इंच फुल एचडी प्लस (1,256×2,760 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 460 पीपीआयची पिक्सल डेंसिटी, 1,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि 240Hz चा टच सँपलिंग रेट देण्यात आला आहे.

प्रोसेसर

नवीन ओप्पो के 15 प्रो प्लसमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 9500s चिपसेट दिला आहे. जो 3.73GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. दुसऱ्या बाजूला ओप्पो के 15 प्रो मध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 8500 सुपर चिपसेट दिला आहे, ज्याची क्लॉक स्पीड 3.4GHz आहे. दोन्ही हँडसेटमध्ये 12GB चे LPDDR5x रॅम दिले आहे. ओप्पो के 15 प्रो प्लसमध्ये 512GB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे, तर ओप्पो के 15 प्रोमध्ये 512GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज दिले आहे.

कॅमेरा सेटअप

ओप्पो के 15 प्रो सीरीजमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा आहे. ज्यामध्ये टू-एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइज़ेशन (OIS), 10x डिजिटल जूम आणि ऑटोफोकस सारखे काही फीचर्स देण्यात आले आहेत. या डिव्हाईसमध्ये मुख्य कॅमेऱ्यासह आणखी एक 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा जोडण्यात आला आहे. हा (f/2.2) अल्ट्रावाइड कॅमेरा आहे, जो 116-डिग्रीचा फील्ड ऑफ व्यू देतो. समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सल (f/2.4) कॅमेरा आहे. याशिवाय, हे हँडसेट 4K/ 60 fps पर्यंतच्या गुणवत्तेत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात.

उत्तरपत्रिका तपासणीत AI ची एंट्री! CBSE ने सुरू केली ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणाली, विद्यार्थ्यांसाठी बदलणार मूल्यांकनाची पद्धत

बॅटरी आणि इतर फीचर्स

ओप्पो के 15 प्रो प्लसमध्ये 8,000mAh बॅटरी आहे, जी 100W सुपरवुक वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ओप्पो के 15 प्रो मध्ये 7,500mAh बॅटरी आहे, जी 80W सुपरवुक वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, कलर टेम्परेचर सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर आणि IR ब्लास्टर सारखे सेंसर दिले आहेत. हे फोन 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 7, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी पोर्ट, बेईडू, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि NavIC ला देखील सपोर्ट करतात.

Web Title: Oppo k15 pro series launched in china is will give amazing experience to gamers read features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’
1

बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
2

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर
3

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर

Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी
4

Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.