सॅमसंग इंडियाच्या गॅलॅक्सी वॉच ८ सिरीजच्या प्री-ऑर्डरला झाली सुरूवात, संधी चुकवू नका! असे आहेत डिव्हाईसचे फीचर्स
सॅमसंग ब्रँडने गॅलॅक्सी वॉच८ आणि गॅलॅक्सी वॉच८ क्लासिक लाँच केले. हे वॉच अनोख्या डिझाईनसह लाँच करण्यात आले आहे. गॅलॅक्सी वॉच अल्ट्राच्या कुशन डिझाइनमुळे युजर्स त्याच्याकडे आकर्षित होत आहेत.या सिरीजमध्ये आतापर्यंतचे सर्वात सडपातळ गॅलॅक्सी वॉच आहेत. या वॉचची प्री ऑर्डर देखील सुरु करण्यात आली आहे.
या लाँचचा भाग म्हणून सॅमसंग आकर्षक सुरूवातीच्या किमती आणि विशेष प्री-ऑर्डर फायदे देत आहे. गॅलॅक्सी वॉच८ ४० मिमी बीटीची किंमत ३२,९९९ रूपये आहे, तर ४० मिमी एलटीई व्हर्जन ३६,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे. मोठे ४४ मिमी बीटी व एलटीई व्हेरिअंट्सची किंमत अनुक्रमे ३५,९९९ रूपये आणि ३९,९९९ रूपये आहे. गॅलॅक्सी वॉच८ क्लासिक ४७ मिमी बीटी मॉडेलची किंमत ४९,९९९ रूपये आहे, तर एलटीई व्हेरिअंट ५०,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे.
९ जुलै ते २४ जुलै २०२५ दरम्यान गॅलॅक्सी वॉच८ सिरीज प्री-बुक करणारे ग्राहक उत्साहवर्धक फायद्यांचा आनंद घेऊ शकतात, जसे जवळपास १२,००० रूपयांपर्यंत मल्टी-बॅक कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनस किंवा जवळपास १५,००० रूपयांपर्यंत मल्टी-बाय ऑफर्स, ज्या विशेषत: नवीन गॅलॅक्सी एस व झेड सिरीज ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. तसेच, ग्राहक आघाडीच्या बँका आणि एनबीएफसींकडून जवळपास १८ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचा आनंद घेऊ शकतात.
गॅलॅक्सी वॉच८ सिरीज दैनंदिन आरोग्यावर देखरेख ठेवण्यासाठी अद्वितीय सोबती आहे. गॅलॅक्सी वॉच अल्ट्रासह पदार्पण करण्यात आलेले विशिष्ट कुशन डिझाइन संपूर्ण गॅलॅक्सी वॉच लाइनअपला नव्या उंचीवर घेऊन जाते. आतापर्यंतची सर्वात सडपातळ डिझाइन प्राप्त करण्यासाठी गॅलॅक्सी वॉच८ ची अंतर्गत संरचना पूर्णत: रिडिझाइन करण्यात आली आणि त्यामधील कम्पोनण्ट माऊंटिंग क्षमता ३० टक्क्यांनी सुधारण्यात आली आहे, ज्यामुळे डिझाइन ११ टक्के सडपातळ आहे. डायनॅमिक लग सिस्टम असलेली ही डिझाइन मनगटावर सहजपणे सामावून जाते.
प्रखर सूर्यप्रकाशात बाहेर असताना देखील सुस्पष्टपणे दिसण्यासाठी डिस्प्ले ५० टक्के ब्राइटर आहे, तसेच ३,००० नीट्स ब्राइटनेस आहे. सुधारित बॅटरीमधून वॉच सक्रिय जीवनशैलीशी सुसंगत राहण्याची खात्री मिळते. याव्यतिरिक्त, ड्युअल-फ्रिक्वेन्सी जीपीएस तपशीलवार व अचूक लोकेशन देते, तर आमचे सर्वात शक्तिशाली ३एनएम प्रोसेसर जलद कामगिरी व उत्तम ऊर्जा कार्यक्षमता देते. उल्लेखनीय बायोअॅक्टिव्ह सेन्सर अधिक अचूकपणे आरोग्याबाबत माहिती देते. अशा उत्तम वैशिष्ट्यांसह गॅलॅक्सी वॉच८ सिरीज तुमच्या आरोग्याबाबत सर्वांगीण माहिती मिळण्यास मदत करते.
गॅलॅक्सी वॉच८ सिरीजमध्ये आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्मार्टवॉचेसची प्रबळ लाइनअप आहे, ज्यामध्ये प्रगत हेल्थ ट्रॅकिंगसह सुधारित डिझाइन आहे. गॅलॅक्सी वॉच८ सिरीज आतापर्यंतची सॅमसंगची सर्वात प्रगत आरोग्य व वेलनेस वीअरेबल आहे, ज्यामध्ये नाविन्यपूर्ण हार्डवेअर व सॉफ्टवेअर क्षमता आहेत. बायोअॅक्टिव्ह सेन्सर असलेला गॅलॅक्सी वॉच८ आरोग्यावर अधिक बारकाईने देखरेख ठेवतो, तसेच झोपेबाबत अधिक अचूक व तपशीलवार माहिती देतो. व्हॅस्क्युलर लोड झोपेच्या दरम्यान तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांवर येणाऱ्या ताण पातळीचे निरीक्षण करण्यास मदत करते. यामध्ये स्लीप कोचिंग देखील आहे, जे वापरकर्त्यांना चांगल्या झोपेच्या सवयी अवलंबण्यास मदत करते.
झोपेवर देखरेख ठेवण्याव्यतिरिक्त गॅलॅक्सी वॉच८ आरोग्यावर देखील उत्तमरित्या देखरेख ठेवतो. नवीन एआय-समर्थित एनर्जी स्कोअर तुमच्यामधील ऊर्जा पातळीबाबत माहिती देतो, ज्यामध्ये शारीरिक व मानसिक ऊर्जा घटकांचा समावेश असतो, ज्यामुळे तुम्ही दररोज आरोग्यदायी दिवसाचा आनंद घेऊ शकता. तसेच, रनिंग कोच७ १ ते १० या स्केलवर तुमच्या फिटनेसचे मूल्यांकन करते आणि वैयक्तिकृत प्रशिक्षण योजना तयार करण्यासोबत प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रेरणादायी टीप्स देते. नवीन व सुधारित टूगेदर वैशिष्ट्य आता रनिंगवर देखरेख ठेवण्यासाठी अनुकूल आहे.
गॅलेक्सी वॉच८ सिरीजच्या स्मार्टवॉचमध्ये पहिल्यांदाच अॅण्टीऑक्सिडण्ट इंडेक्स वैशिष्ट्य देखील समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्हाला फक्त पाच सेकंदात कॅरोटीनॉइडची पातळी मोजता येते आणि आरोग्यदायी वृद्धत्वासाठी माहितीपूर्ण जीवनशैली निवडता येते.
गुगलसोबत सहयोगाने डिझाइन करण्यात आलेली गॅलॅक्सी वॉच८ सिरीज गुगलचा असिस्टण्ट जेमिनी असलेला पहिला स्मार्टवॉच आहे, जो सर्वोत्तम असण्यासह आधुनिक वेअर ओएस ६ वर कार्य करतो. वन यूआय ८ वॉचच्या सादरीकरणासह इंटरफेस आता वॉचच्या आकारमानांना सर्वोत्तमपणे जुळून जाण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. नवीन मल्टी-इन्फो टाइल्स आरोग्य स्थिती, हवामान व आगामी इव्हेण्ट्स अशी प्रमुख माहिती सोईस्करपणे देते. तसेच, अपडेटेड नाऊ बार आणि सुव्यवस्थित नोटिफिकेशन्स सर्वात महत्त्वाचे क्रियाकलाप सहजपणे उपलब्ध करून देतात, तसेच सुस्पष्टपणे पाहता येतात.
तसेच, गॅलॅक्सी वॉच८ सिरीज सॅमसंग हेल्थ अॅपमधील नवीन अद्वितीय आरोग्य वैशिष्ट्यांसह येते. बेडटाइम गाइडण्स तुमच्या सर्कॅडियन रिदमचे मोजमाप करून झोपायला जाण्यासाठी योग्य वेळ सुचवू शकते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला उत्साहित वाटेल.