संपूर्ण जगभरामध्ये आज छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात असतानाच सांगलीमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी झाली. सांगली बुकीज या चळवळीच्या माध्यमातून छत्रपतींचे विचार त्यांचे आचार लहान लहान मुलांच्या मनामध्ये उतरावेत आणि ते रुजावेत हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अनेक पुस्तकं वाचण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान लहान लहान मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून सांगलीतील आमराई मध्ये निसर्गाच्या सानिध्यात हा उपक्रम दर शनिवार रविवारी राबवण्यात येतो. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शिवजयंती निमित्त आज छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती सांगणाऱ्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले यामध्ये जेष्ठ नागरिकांसह महिला आणि लहान लहान मुलांनीही सहभाग नोंदवला.