
डिझाईन कमाल आणि फीचर्स दमदार! Realme चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय, किंमत ठरली खास
Realme चा नवीन स्मार्टफोन 4GB + 64GB, 4GB+128GB आणि 6GB + 128GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसच्या 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,499 रुपयांपासून सुरु होते. तर 4GB+128GB स्टोरेज वाल्या टॉप मॉडेलची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनचे 6GB + 128GB व्हेरिअंट 16,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. लाँच ऑफरचा एक भाग म्हणून, कंपनी 1,500 रुपयांपर्यंतची बँक ऑफर देखील देत आहे. हे डिव्हाइस 21 एप्रिल रोजी ॲमेझॉन आणि रियलमी इंडियाच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध होईल. हे डिव्हाइस फ्रॉस्ट सिल्व्हर आणि थंडर ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Realme)
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर फोनमध्ये 6.8-इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 900 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिले आहे. या फोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिले आहे.
फोनला पावर देण्यासाठी यामध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट दिले आहे. या नवीन डिव्हाईसमध्ये एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देखील दिले आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी या डिव्हाईसमध्ये AirFlow वेपर चेंबर कूलिंग सिस्टम देखील दिले आहे.
फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. ज्यासोबत एक सेकेंडरी कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. हे डिव्हाइस 1080p/30 fps पर्यंतच्या गुणवत्तेत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते.
फोनमध्ये 15W वायर्ड चार्जिंग, रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि बाईपास चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.