Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Redmi 17C 5G Launched: रेडमीने एक नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला आहे. दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत बजेट रेंजमध्ये आहे. या स्मार्टफोनची भारतातील लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 30, 2026 | 12:13 PM
Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष... इतकी आहे किंमत

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष... इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • रेडमी 17 सी 5G ची सिंगापूरच्या बाजारात अधिकृत एन्ट्री झाली आहे.
  • या स्मार्टफोनच्या भारतातील लाँचबाबत कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
  • ब्लॅक, ब्राऊन आणि पर्पल अशा तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.
Redmi Smartphone Launched: टेक कंपनी रेडमीने जागतिक बाजारात आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन Redmi 17C 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. यापूर्वी कंपनीने रेडमी 17 4G आणि रेडमी 17 5G डिव्हाईस लाँच केले होते. आता कंपनीने हा स्मार्टफोन सिंगापूरमध्ये लाँच केला आहे. मोठा डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि 5G कनेक्टिविटीसह हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात कधी लाँच केला जाणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती जाहिर केली नाही.

BSNL Data Plan: डेटा संपण्याची चिंता मिटली! 40 रुपयांहून कमी किंमतीत तब्बल 20GB डेटा; बीएसएनएलचा हा भन्नाट प्लॅन पाहिलात का?

रेडमी 17 सी 5G ची किंमत

सिंगापूरमध्ये हा स्मार्टफोन S$279 म्हणजेच सुमारे 19 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्राऊन आणि पर्पल रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. ब्राउन व्हेरिअंटमध्ये ‘व्हीगन लेदर’ फिनिश देण्यात आले आहे. शाओमीने भारत आणि इतर बाजारपेठांसाठी याची किंमत व लाँचची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Redmi ) 

रेडमी 17 सी 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

रेडमीच्या नवीन स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये 6.9 इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 1600×720 पिक्सेल आहे. या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. याची नॉर्मल ब्राइटनेस 660 निट्स आणि HBM मोडमध्ये 810 निट्सपर्यंत आहे. या स्मार्टफोनला डोळ्यांच्या सुरक्षेसाठी डीसी डिमिंग आणि TÜV Rheinland सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे.

प्रोसेसर

परफॉर्मंससाठी नव्या रेडमी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 64GB आणि128GB स्टोरेज ऑप्शन देखील मिळणार आहे. फोनमध्ये मेमोरी एक्सपेंशनद्वारे रॅम 8GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. तर मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचे अपर्चर f/1.8 आहे. फोनमध्ये एक सेकेंडरी लेंस देखील आहे. फोनच्या कॅमेऱ्यात HDR, नाइट मोड आणि पोर्ट्रेट मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, 30fps वर 1080p पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाऊ शकते. स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर समोरील बाजूला देखील एचडीआर, पोर्ट्रेट आणि नाइट मोडसह सॉफ्ट-लाइट रिंग मिळणार आहे.

5G नेटवर्कबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टॉवरची EMF मर्यादा होणार दुप्पट; आता एकाच टॉवरमधून मिळणार अधिक कव्हरेज

बॅटरी

कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. बॉक्समध्ये कंपनी 15W चार्जर देणार आहे.

Web Title: Redmi 17c 5g launched in global market with 6000mah battery and 120hz display know about the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै
1

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै

Apple ने लाँच केला पहिला स्मार्ट डिस्प्ले HomeView! फेस रिकग्निशन फीचरने सुसज्ज… जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स
2

Apple ने लाँच केला पहिला स्मार्ट डिस्प्ले HomeView! फेस रिकग्निशन फीचरने सुसज्ज… जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे
3

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत
4

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.