
बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’
रेडमी नोट 17 प्रो मॅक्स स्मार्टफोन 8GB + 256GB आणि 8GB + 512GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 256GB या बेस व्हेरिअंटची किंमत 79,980 येन म्हणजेच सुमारे 48,000 रुपये आणि 8GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 99,980 येन म्हणजेच सुमारे 60,000 रुपये आहे. (फोटो सौजन्य: Redmi)
नवीन रेडमी स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.83 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1.5K, पीक ब्राइटनेस 3,500 निट्सपर्यंत आणि सँपलिंग रेट 3,200Hz ची आहे. यासोबतच डिस्प्लेला लो ब्लू लाइट आणि फ्लिकर फ्री मोडसाठी TÜV Rheinland सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे. हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 6 जेन 5 चिपसह 16GB पर्यंत रॅमसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन शाओमीच्या HyperOS 3 ने सुसज्ज आहे. या डिव्हाईसमध्ये ऑफलाइन एआय ट्रांसलेशन आणि रियल टाइम स्पीच ट्रांसक्रिप्शन सारखे एआय-फीचर मिळणार आहेत. हा फोन चार वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड्स आणि सहा वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स ऑफर करतो.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. रेडमी नोट 17 प्रो मॅक्स ब्लॅक, पर्पल आणि क्लाउड ब्लस कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या क्लाउड ब्लश कलर व्हेरिअंटमध्ये कंपनीने फोटोक्रोमिक टेक्नोलॉजीचा वापर केला आहे, जे सूर्यप्रकाशात सफेदहून पिंकिश ऑरेंज रंगात बदलते.
हा रेडमी नोट सिरीजचा पहिला प्रो मॅक्स मॉडेल आहे, ज्यामध्ये 10,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. शाओमीने या फोनमध्ये सिलिकन कार्बन टेक्नोलॉजी बॅटरी दिली आहे, ज्याची कॅपेसिटी 10,000mAh आहे. शाओमीचं असं म्हणणं आहे की, सामान्य वापरादरम्यान फोन तीन दिवसांचे बॅटरी बॅकअप ऑफर करते. हा स्मार्टफोन 100W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो.