
बजेटची चिंता सोडा! दरमहा फक्त 668 रुपये भरून घरी आणा Samsung चा हा 5G स्मार्टफोन... असे आहेत फीचर्स
सॅमसंग गॅलेक्सी ए35 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. या डिव्हाईसमध्ये 8GB रॅम आणि 50MP कॅमेरासारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. हाय-एंड मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन आता ग्राहकांना 20 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या ऑफरबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Samsung )
कंपनीच्या या डिव्हाईसची स्टँडर्ड किंमत 33,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट आता या स्मार्टफोनवर जबरजस्त डिस्काऊंट ऑफर करत आहे. या डिस्काऊंटनंतर स्मार्टफोनची किंमत केवळ 18,999 रुपये झाली आहे. तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक किंवा फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून स्मार्टफोनच्या खरेदीवर 950 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता, ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत फक्त 18,049 रुपये होणार आहे.
तसेच तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ईएमआय पर्याय देखील वापरू शकता. तुम्ही दर महिना केवळ 668 रुपयांचा ईएमआय भरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर्स देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होणार आहे. एक्सचेंज ऑफर्सअंतर्गत, तुम्ही तुमचा जुना फोन 16 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी एक्सचेंज करू शकता.
सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे आणि डिव्हाईस 1,900 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए35 5G मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5MP ची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 12MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 15 वर चालते आणि यामध्ये सहा अँड्रॉईड ओएस अपग्रेड मिळणार आहे. सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे.
Ans: होय, सॅमसंग स्मार्टफोन उत्कृष्ट डिस्प्ले, कॅमेरा, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि विश्वासार्ह परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात.
Ans: होय, सॅमसंगकडे बजेट, मिड-रेंज आणि प्रीमियम श्रेणीतील अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.
Ans: गॅलेक्सी सिरीज ही सॅमसंगची स्मार्टफोन सिरीज असून, त्यामध्ये गॅलेक्सी एस, गॅलेक्सी झेड, गॅलेक्सी ए आणि गॅलेक्सी एम सिरीजचा समावेश आहे.