गुपचूप स्टोरी पाहण्यापासून ते स्पेशल फॉन्ट्सपर्यंत... Instagram Plus मध्ये यूजर्सना मिळणार हे खास फीचर्स; किंमत केवळ 299 रुपये
Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला
इंस्टाग्राम प्लसमध्ये मुख्य विषयांवर फोकस करण्यात आला आहे. ज्यामध्ये लोकांच्या अधिक जवळ जाणे, प्रिव्ह्यू आणि इनसाइट्स पाहणे, आणि इंस्टाग्राम कस्टमाइझ करणे यांचा समावेश आहे. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर, इंस्टाग्राम प्लस खरेदी करणाऱ्या यूजर्सना मेटा असे टूल्स आणि कस्टमाइजेशन ऑप्शन्स ऑफर करणार आहे, जे सामान्य यूजर्सना मिळणार नाहीत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्राम प्लॅसमध्ये स्टोरीवर जास्त फोकस करण्यात आला आहे. इंस्टाग्राम प्लॅस खरेदी करणारे यूजर्स पाहू शकणार आहेत की, त्यांची स्टोरी किती लोकांनी पुन्हा पाहिली. यूजर्स क्लोज फ्रेंड्स फीचरव्यतिरिक्त अनलिमिटेड स्टोरी ऑडियंस लिस्ट देखील तयार करू शकणार आहेत. तसेच यूजर्स व्यूअर लिस्टमध्ये न येता देखील दुसऱ्यांच्या स्टोरी गुपचुप प्रिव्यू देखील करू शकणार आहेत.
तसेच हा प्लॅन यूजर्सना त्यांच्या स्टोरीची टाईम लिमीट 24 तासांनी वाढवून 48 तास करण्याची सुविधा देखील देतो. यासोबतच जास्तीच्या विजिबिलिटीसाठी दर आठवड्याला एक स्टोरी स्पॉटलाइट करण्याचा देखील पर्याय दिला जात आहे. तसेच, यूजर्स त्यांच्या स्टोरी व्यूअर लिस्टमध्ये सर्च करून पाहू शकणार आहेत की त्यांचा कंटेट कोण पाहत आहे. याशिवाय, इंस्टाग्राम प्लस यूजर्स त्यांच्या फॉलोअर्सच्या फीडमध्ये न दिसता, थेट त्यांच्या प्रोफाईल आणि हाइलाइट्समध्ये पोस्ट शेअर करू शकणार आहेत.
फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी
इंस्टाग्राम प्लसमध्ये केवळ स्टोरी अपग्रेडच नाही तर मेटा पेड सब्सक्राइबर्ससाठी अनेक कॉस्मेटिक अपग्रेड्स देखील जोडणार आहे. इंस्टाग्राम प्लस यूजर्सना अॅनिमेटेड ‘सुपर हार्ट’ रिअॅक्शन्स मिळणार आहेत. हे चमकणारे अॅनिमेटेड हार्ट्स असणार आहेत, जे इंटरॅक्शनदरम्यान स्क्रीनवर दिसतील. इंस्टाग्राम प्लस यूजर्सना इंस्टाग्राम आणि क्रिएटर्स द्वारे निवडलेल्या कस्टम अॅप आइकॉन्ससोबतच बायोसाठी स्पेशल फॉन्ट्सचा अॅक्सेस देखील मिळणार आहे. तसेच यूजर्सना प्रोफाइल पिन्सचा पर्याय देखील मिळणार आहे. ज्यामध्ये यूजर्सना सहा पोस्ट पिन करण्याची आणि सर्वात महत्त्वाचा कंटेट हायलाईट करण्याची सुविधा मिळणार आहे.
Ans: मेटा प्लॅटफॉर्म्स या कंपनीच्या मालकीचे इंस्टाग्राम आहे.
Ans: इंस्टाग्राम रिल्स हे शॉर्ट व्हिडिओ फीचर आहे, ज्याद्वारे यूजर्स लहान व्हिडिओ तयार करून शेअर करू शकतात.
Ans: इंस्टाग्रामच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हेट अकाऊंट पर्याय सुरू करता येतो.






