
4,900mAh बॅटरी अन् Exynos 2500 चिपसेट... नव्या Samsung स्मार्टफोनने वेधले सर्वांचं लक्ष, किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का
कंपनीचा नवीन स्मार्टफोन 8GB+ 128GB, 8GB+ 256GB आणि 8GB+ 512GB या व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 799 यूरो म्हणजेच सुमारे 89,000 रुपये, 8जीबी + 256जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 899 यूरो म्हणजेच सुमारे 1,00,000 रुपये आणि 8जीबी + 512जीबी स्टोरेज या टॉप व्हेरिअंटची किंमत 1,099 यूरो म्हणजेच सुमारे 1,22,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या सॅमसंग स्मार्टफोनची विक्री 4 सप्टेंबरपासून कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवर सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लूबेरी, ग्रॅफाइट आणि पिस्ता कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Samsung)
कंपनीच्या या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. हे डिव्हाईस अँड्रॉईड 17 वर आधारित लेटेस्ट वनयूआय 9 वर चालते. या फोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी+ डायनॅमिक ॲमोलेड 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1,900 निट्सची आहे. हा फोन IP68 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन एक्सिनोस 2500 SoC सह लाँच करण्यात आला आहे. जो 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे.
नवीन स्मार्टफोन 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला सपोर्ट करतो. यासोबतच 12-मेगापिक्सेल (f/2.2) अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हा फोन 3x ऑप्टिकल झूम आणि 30x पर्यंत डिजिटल झूमला सपोर्ट करतो. फोनमध्ये 12-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
नवीन सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4,900mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 6E, ब्लूटूथ 5.4, आणि यूएसबी टाइप-सी कनेक्टिविटी दिली आहे. यासोबतच या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.