सॅमसंगने लाँच केली S25 सिरीज (फोटो - ट्विटर/ @parentesis)
Samsung Galaxy Unpacked Event: सॅमसंग ही जगातील एक मोठी टेक कंपनी आहे. सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन टेक प्रॉडक्ट लॉंच करत असते. दरम्यान आज सॅमसंग कंपनीचा Unpacked इवेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने अनेक नवीन प्रोडक्ट्स कंपनी जगासमोर सादर केली आहेत. यामध्ये कंपनीने आकर्षक अशी Galaxy S25 सीरीज लाँच केली आहे. या सिरिजअंतर्गत Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra हे मॉडेल लाँच केले गेले आहेत. दरम्यान या मॉडेल्समध्ये ग्राहकांना कोणकोणती फीचर्स मिळणार आहेत, ते जाणून घेऊयात.
सॅमसंग कंपनीने आपल्या Unpacked इव्हेंटमध्ये Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत लाँच केले आहेत. या नवीन सिरीजमधील मोबाइलमध्ये अत्याधुनिक एआय फीचर आणि अनेक जबरदस्त अपडेट्स देण्यात आले आहेत. स्नॅपड्रॅगन ८ एलीट प्रोसेसर दिला आहे. यामधील अल्ट्रा मॉडेलमध्ये १ टीबीपर्यंत स्टोरेजचे पर्याय मिळणार आहेत. तीनही स्मार्टफोनमधील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊयात.
¡Aquí la nueva seie #GalaxyS25! 😍
.
.
.@SamsungMexico #GalaxyUnpacked #galaxys25ultra #smartphone pic.twitter.com/yjQ7HK1NAa— Paréntesis.com (@parentesis) January 22, 2025
सॅमसंग Galaxy S25 सीरीजमध्ये एआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. यामध्ये एक लाईव्ह व्हिडिओ फीचर मिळणार आहे. मोबाइलमधील डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने यामध्ये पर्सनल डेटा इंजिन हे अपडेट दिले आहे.
A true AI companion is coming.
Join us at #GalaxyUnpacked, now happening LIVE. #GalaxyAIhttps://t.co/hvqISxezgy— Samsung Mobile (@SamsungMobile) January 22, 2025
तसेच Galaxy S25 सीरीजमध्ये लॉक स्क्रीनच्या खालील बाजूस Now Bar मिळणार आहे. हे फीचर आयफोनच्या डायनामीक फीचर प्रमाणे असणार आहे. यामध्ये यूजर्सना प्रत्येक दिवसाची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये अपकमिंग मीटिंग, रिअल टाइम अपडेटची माहिती मिळणार आहे.
काय आहेत फीचर्स?
सॅमसंग गॅलॅक्सी S25 सिरीजमध्ये 6.9 इंचाचा QHD+Dynamic AMOLED 2Xd डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये १२० एचझेडचा रिफ्रेश रेट मिळणार आहे. यामध्ये व्हिजन बूस्टर कलर टोनसारखे फिचर मिळणार आहे.
तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलाईट प्रोसेसर मिळणार आहे. यामध्ये गॅलॅक्सी एआय सपोर्ट दिला आहे. तसेच या सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड, २०० मेगापिक्सलचा वाईड, ५० मेगापिक्सलचा टेलीफोटो आणि ऑप्टिकल झूम हे फिचर दिले आहे. सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
Galaxy S25 मधील स्मार्टफोन्समध्ये १२ जीबी रॅम १ टीबी, १२+५१२ आणि १२+२५६ जीबी स्टोरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये चार्जिंगसाठी ५००० mAh क्षमतेची बॅटरी देखील देण्यात आली आहे. त्याला ४५ वॅटचा चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. हा फोन अर्ध्या तासामध्ये ० ते ६० टक्के चार्ज केला जाऊ शकतो. कनेक्टिव्हीटीसाठी या स्मार्टफोन्समध्ये वायफाय आणि ब्लूटूथ v. ५.४ सपोर्ट देण्यात आला आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोन्समध्ये आयपी ६८ हे रेटिंग प्राप्त झाले आहे.