(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, शेती, घरे, जनावरे आणि व्यवसायांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.डोळ्यांदेखत शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
‘कमळी’ची जागतिक झेप, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मराठी मालिकेचा प्रोमो
शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत काही ठिकाणी मदतकार्य सुरू केल्याचेही सांगितले जात आहे. पावसाने झालेल्या नुकसानीमुळे नैराश्यूतून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दु:खद घटना घडल्याचे वृत्त येत आहेत.मराठवाड्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे अनेक गावात पूर आला आहे. घरं, शेतं आणि पिकांना मोठा फटका बसला आहे. लोकं खूप त्रस्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना शासन आणि काही संस्था लोकांना मदत करत आहेत. त्याचबरोबर, मराठी कलाकार सुबोध भावे, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे,प्रवीण तरडे, ऋतुराज फडके आणि सौरभ चौघुले यांसारखे अनेक कलाकारही मदतीसाठी पुढे आले आहेत.
“त्याला मारलं… आणि नंतर घरातही आणलं!”, बॉबी देओलने सांगितला धर्मेंद्र यांचा न ऐकलेला किस्सा
अशातच आता संकर्षण कऱ्हाडेने मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. त्याने एका व्हिडीओमधून चाहत्यांनाही मदत करण्याचं आवाहन केलं आहे. संकर्षणने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो म्हणतो, हा व्हिडीओ मी अत्यंत काळजीपूर्वक, जबाबदारी व तळमळीने करीत आहे. काही दिवसांपासून बातम्यांमधून मराठवाडामधील पूर परिस्थिती पाहत आहे. उभ्या राहिलेल्या पिकांमध्ये कंबरेइतकं पाणी शिरलं आहे., सोयाबीन, कापूससह अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. हे फार फार क्लेशदायक आहे.”
पुढे संकर्षण असंही म्हणाला, “मी सध्या मुंबईत आहे, तिथे येऊन मदत करू शकत नाही. त्यामुळे मी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ एक नंबर दिला. माझ्याकडून मी माझ्या परभणी, मराठवाड्यासाठी फूल न फुलाची पाकळी म्हणून मदत जमा करण्याचा प्रयत्न करीत आहे. हा व्हिडीओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, मग तो या क्षेत्रातील असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातला… जगभरातील ज्या मराठी माणसाला मदत करता येईल, त्यानं जरूर मदत करावी ही विनंती.”
हा व्हिडीओ पोस्ट करत संकर्षणने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “थोडा संयम ठेवा… पुढच्या वर्षी हेच पाणी साथ देईल, त्रास देणार नाही…” या शेअर केलेल्या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी मदत करण्याचं आश्वासन देखील देलं आहे. तसंच अनेकांनी त्याचं कौतुकही केलं आहे.