
Samsung Galaxy Unpacked 2026: कधी आणि कुठे सुरु होणार सॅमसंग लाईव्ह ईव्हेंट? कोणते डिव्हाईस होणार लाँच? जाणून घ्या
सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड ईव्हेंट 2026 आज 22 जुलै रोजी लंडनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, हा ईव्हेंट संध्याकाळी ठीक 6:30 वाजता सुरु होणार आहे. भारतीय सॅमसंगच्या अधिकृत युट्यूब चॅनेल्स, सॅमसंग न्यूजरूम वेबसाइट किंवा सॅमसं.कॉम वर हा ईव्हेंट लाईव्ह पाहू शकतात आणि ईव्हेंटचे सर्व अपडेट्स मिळवू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
💙 Like this post and get a front-row seat to what’s next. Can you guess what’s coming? Join us at Samsung Galaxy Unpacked on July 22. A new shape unfolds. pic.twitter.com/qnMysUXv4T — Samsung India (@SamsungIndia) July 13, 2026
कंपनीने आयोजित केलेल्या या ईव्हेंटमध्ये अनेक प्रोडक्ट्स लाँच केले जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये फोल्डेबल आणि फ्लिप-स्टाइल फोन्स, वियरेबल डिव्हाईस आणि निवडक बाजारांसाठी सॅमसंग गॅलेक्सी कार्ड लाँच केले जाण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड 8, गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 8 हे डिव्हाईस सादर केले जाण्याची शक्यता आहे. यापैकी गॅलेक्सी झेड फोल्ड 8 मध्ये जास्त कॉम्पॅक्ट डिझाईन मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय, कंपनी नवीन गॅलेक्सी वॉच सिरीज देखील सादर करण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजेच सॅमसंगने नेहमीच आपल्या फोल्डेबल डिव्हाईससोबत नवीन वेअरेबल्सची घोषणा केली आहे. त्यामुळे, यावेळी देखील कंपनी अशा घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी स्पाइडर-मॅनसह भागिदारी करत नवीन प्रोडक्ट लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनी त्यांच्या लेटेस्ट गॅलेक्सी झेड फोल्ड 8 ला स्पाइडर-मॅन ब्रांडिंगसह लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने हे देखील निश्चित केले आहे की, अमेरिकन बाजारपेठेत नवीन ‘सॅमसंग गॅलेक्सी कार्ड’ उपलब्ध होईल, जे थेट ‘ॲपल कार्ड’शी स्पर्धा करेल.