7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर... Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
कंपनीने यापूर्वीच Vivo X300 आणि X300 Pro हे दोन स्मार्टफोन्स X300 सीरीज अंतर्गत लाँच केले आहेत. त्यांनतर आता कंपनीने या सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीच्या नवीन स्मार्टफोन मॉडेलमध्ये दमदार बॅटरी, फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि Zeiss कॅमेरा सिस्टिम दिली आहे. नवीन स्मार्टफोनची किंमत आणि याचे इतर फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Vivo)
विवोने त्यांच्या स्मार्टफोनची प्री ऑर्डर सुरु केली आहे. मात्र अद्याप या स्मार्टफोनच्या किंमतीचा खुलासा करण्यात आला नाही. स्मार्टफोनची पहिली विक्री 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. कंपनी स्मार्टफोनची विक्री सुरु होण्यापूर्वी किंमतीची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही जर आता नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Vivo X300e तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र तुम्हाला स्मार्टफोनच्या किंमती जाहिर होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.59 इंच 1.5K फ्लॅट OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो हाय-एंड गेमिंग आणि मल्टीटास्किंगचा अधिक चांगला अनुभव ऑफर करतो. कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी नव्या Vivo X300e मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 50 मेगापिक्सेल IMX पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील मिळणार आहे. कॅमेरा सिस्टिम Zeiss इमेजिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे अधिक चांगला रंग, डिटेल्स आणि ऑप्टिकल क्वालिटी मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
विवोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 7200mAh बॅटरी दिली आहे, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे, ज्यामुळे जलद चार्जिंग शक्य होते. या डिव्हाइसमध्ये मेटल फ्रेम आणि डाव्या बाजूला एक चौकोनी कॅमेरा मॉड्यूल आहे. या फोनमध्ये अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.






