Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोनसोबत मिळणारी इजेक्टर पिन बरीच फायद्याची! Wi-Fi पासून ईयरबड्सपर्यंत… अनेक समस्या चुटकीसरशी होतील दूर

Use Of Mobile SIM Pin: स्मार्टफोन बॉक्समध्ये मिळणार छोटी पिन केवळ सिम कार्डसाठी फायद्याची आहे का? या पिनचे असे अनेक फायदे आहेत, ज्याबाबत 90 टक्के यूजर्सना माहिती नाही. अशाच काही फायद्यांबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2026 | 11:37 AM
Tech Tips: स्मार्टफोनसोबत मिळणारी इजेक्टर पिन बरीच फायद्याची! Wi-Fi पासून ईयरबड्सपर्यंत... अनेक समस्या चुटकीसरशी होतील दूर

Tech Tips: स्मार्टफोनसोबत मिळणारी इजेक्टर पिन बरीच फायद्याची! Wi-Fi पासून ईयरबड्सपर्यंत... अनेक समस्या चुटकीसरशी होतील दूर

Follow Us
Follow Us:
  • सिम इजेक्टर पिनचा वापर Wi-Fi राऊटर, ईयरबड्स आणि इतर गॅझेट्स रीसेट करण्यासाठीही करता येतो.
  • ही छोटी पिन आपत्कालीन परिस्थितीत पॅकेज उघडणे, धूळ साफ करणे आणि छोट्या कामांसाठी उपयोगी ठरते.
  • स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये मिळणारे हे टूल फक्त SIM ट्रे काढण्यासाठीच नसून अनेक कामांचे मल्टी-युटिलिटी साधन आहे.
Sim Tool Hacks and Tricks: स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर आपल्याला त्यासोबत डिव्हाईसचा बॉक्स देखील दिला जातो, ज्यामध्ये चार्जर केबल, ॲडाप्टर आणि आवश्यक कागदपत्रे असतात. या सर्वांसोबत बॉक्समध्ये एक छोटी, पातळ आणि मेटल पिन देखील असते. या छोट्या पिनला सिम इजेक्टर टूल असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती असेल की, या सिम इजेक्टर टूलचा वापर सिम कार्ट ट्रे स्मार्टफोनमधून बाहेर काढण्यासाठी केला जातो. पण या टूलचा इतकाच वापर आहे का? नाही. मजबूत मेटलने बनलेली ही छोटी पिन तुमच्या अनेक कामांत मदत करू शकते. सिम इजेक्टर टूलचा वापर कशा प्रकारे होऊ शकतो, याबाबत आता जाणून घेऊया.

भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही

वायफाय राऊटर रिसेट करण्यासाठी होऊ शकते मदत

जर तुमचा वायफाय राऊटर योग्य पद्धतीने काम करत नसेल किंवा इंटरनेटमध्ये वारंवार समस्या येत असेल तर ही पिन तुमची समस्या सोडणवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सहसा, सर्व राऊटर्सच्या मागील बाजूला एक छोटं रिसेट बटन असतं, जे बॉडीमध्ये आतल्या बाजूला सेट केलेलं असते. तुम्ही सिम इजेक्टर टूल त्या खाचेत घालून 10 सेकंदांपर्यंत दाबून ठेवले तर राऊटर फॅक्ट्री सेटिंग्सवर रिसेट होतो. लक्षात ठेवा की, वायफाय राऊटर रिसेट केल्यानंतर तुम्ही सेव्ह केलेला नेटवर्क पासवर्ड काढून टाकला जाईल आणि तुम्हाला हा पासवर्ड पुन्हा सेट करावा लागेल.  (फोटो सौजन्य – AI Created) 

ईयरबड्स आणि चार्जिंग केस रीसेट करा

अनेक वायरलेस ईयरबड्स आणि त्यांच्या चार्जिंग केसमध्ये एक छोटे हिडन रीसेट बटन असते. जेव्हा ईयरबड्स फोनसोबत कनेक्ट करण्यात समस्या येत असतील तर तुम्ही सिम इजेक्टर टूलच्या मदतीने हे बटन दाबून ईयरबड्स रीसेट करून पुन्हा एकदा स्मार्टफोनसोबत कनेक्ट करू शकता.

गॅझेट्स रिसेट करण्यासाठी फायदेशीर

केवळ राऊटर किंवा ईयरबड्स नाही, तर अनेक टॅब्लेट्स, पोर्टेबल गॅजेट्स आणि नेटवर्किंग डिव्हाईसमध्ये देखील असे रिसेट बटन दिले जातात, जे बोटाने प्रेस केले जाऊ शकत नाही. अशावेळी सिम पिन एक परफेक्ट टूल ठरते.

इमरजेंसी कटर

जर तुमच्याकडे कटर किंवा कात्री नसेल आणि तुम्हाला कूरियर किंवा पार्सल खोलायचे असेल तर तुम्ही सिम इजेक्टर पिनच्या टोकदार भागाचा वापर करू शकता. याच्या मदतीने तुम्ही पॅकेजिंग टेप, प्लास्टिक रॅपिंग किंवा एखाद्या बॉटलचे सिल अगदी सहजपणे खोलू शकतो. पण याचा वापर करताना काळजी घेणं गरजेचे आहे, अन्यथा इजा होऊ शकते.

Truecaller अडचणीत? TRAI ने सरकारकडे मागितले विशेष अधिकार; मंजुरी मिळाल्यास होऊ शकते मोठी कारवाई

घरातील छोट्या कामांसाठी फायदेशीर

ही पिन आप्तकालीन परिस्थितीत छोट्या – मोठ्या कामांत मदत करू शकते. याच्या मदतीने तुम्ही छोटे स्क्रू खोलू शकता, एखादी अत्यंत छोटी वस्तू उचलू शकता किंवा सरकवू शकता. फोनचा स्पीकर किंवा चार्जिंग पोर्टच्या बाजूला जमा झालेली धूळ काढू शकता.

Web Title: There are so many hidden uses of mobile sim pin including reset wifi router and many more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही
1

भारतात Satellite Phone खरेदी करण्याचा विचार करताय? काय आहेत नियम? 90 टक्के लोकांना माहिती नाही

Tech Tips: पाऊस असो किंवा वादळी वारा.. हवामान खराब होण्यापूर्वीच मिळणार अलर्ट! फोनमध्ये आत्ताच ऑन करा ‘ही’ सेटिंग
2

Tech Tips: पाऊस असो किंवा वादळी वारा.. हवामान खराब होण्यापूर्वीच मिळणार अलर्ट! फोनमध्ये आत्ताच ऑन करा ‘ही’ सेटिंग

Truecaller अडचणीत? TRAI ने सरकारकडे मागितले विशेष अधिकार; मंजुरी मिळाल्यास होऊ शकते मोठी कारवाई
3

Truecaller अडचणीत? TRAI ने सरकारकडे मागितले विशेष अधिकार; मंजुरी मिळाल्यास होऊ शकते मोठी कारवाई

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त… काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या
4

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त… काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.