Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: टेक बाजारात होणार धमाका! जुलै महिन्यात लाँच होणार एकापेक्षा एक पावरफुल स्मार्टफोन्स; असे असू शकतात फीचर्स

जुलै महिन्यात टेक कंपन्या अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. लाँचपूर्वीच काही स्मार्टफोन्सचे फीचर्स देखील समोर आले आहेत. काही टेक कंपन्यांनी अधिकृतपणे त्यांच्या आगामी स्मार्टफोन लाँचिंगची तारीख जाहिर केली आहे. त्यामुळे जुलै महिना स्मार्टफोनप्रेमींसाठी खास ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2026 | 12:52 PM
Upcoming Smartphones: टेक बाजारात होणार धमाका! जुलै महिन्यात लाँच होणार एकापेक्षा एक पावरफुल स्मार्टफोन्स; असे असू शकतात फीचर्स

Upcoming Smartphones: टेक बाजारात होणार धमाका! जुलै महिन्यात लाँच होणार एकापेक्षा एक पावरफुल स्मार्टफोन्स; असे असू शकतात फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • जुलै 2026 मध्ये मोटोरोला, सॅमसंग, नथिंग आणि ओप्पोचे अनेक नवे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच होणार आहेत.
  • आगामी स्मार्टफोन्समध्ये फोल्डेबल डिझाइन, फ्लॅगशिप प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीसारखे दमदार फीचर्स मिळू शकतात.
  • नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर जुलै महिन्यातील लाँचची वाट पाहणे फायदेशीर ठरू शकते.
Upcoming Smartphones July 2026: भारतीय टेक बाजारात लेटेस्ट आणि अपग्रेड स्मार्टफोन्सची मागणी वेगाने वाढत आहे.  लोकं नवीन फीचर्स असणाऱ्या स्मार्टफोन खरेदीला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे टेक कंपन्या देखील भारतीय बाजारात नवीन आणि अपग्रेड स्मार्टफोन्स लाँच करत असतात. असेच काही स्मार्टफोन्स जुलै महिन्यात देखील लाँच केले जाणार आहेत. त्यामुळे आता तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडा धीर धरा. कारण जुलै महिन्यात भारतीय बाजारात टेक कंपन्या अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

WhatsApp Update: युजर्सची प्रतीक्षा संपली! आता चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही; मेटाने रिलीज केलं नवं Username फीचर

मोटोरोला रेझर 70 सिरीज

मोटोरोला त्यांच्या मजबूत आणि स्टाइलिश स्मार्टफोन्ससाठी ओळखला जातो. यूजर्स मोटोरोलो स्मार्टफोन्सना मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवतात. आता कंपनी त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याचे प्लॅनिंग करत आहे. जुलै महिन्यात भारतीय बाजारात रेझर 70 सिरीज लाँच केली जाणार असल्याची चर्चा आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच करू शकते. लीक्सनुसार, हे आगामी डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर आणि 5,000mAh च्या दमदार बॅटरीने सुसज्ज असणार आहे. (फोटो सौजन्य: नथिंग, ओप्पो) 

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 आणि गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा

सॅमसंग देखील जुलै महिन्यात दोन नवीन प्रिमियम स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारी करत आहे. तसेच जुलै 2026 मध्ये कंपनीच्या गॅलेक्सी अनपॅक्ड ईव्हेंटचे देखील आयोजन केले जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी गॅलेक्सी झेड फोल्ड 8 आणि गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा सारखे दोन फोल्ड स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारी करत आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या अपेक्षित किंमतींबाबत काही लीक्स समोर आले आहेत. गॅलेक्सी झेड फोल्ड 8 ची किंमत सुमारे 1.75 लाख रुपये असू शकते. तर गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा कंपनी 2 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे.

नथिंग फोन 4b

जुलै महिन्यात नथिंग देखील त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार असून याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. कंपनीने सोशल मीडियावर एक टिझर शेअर करत नथिंग फोन (4b) लाँचिंगची घोषणा केली आहे. लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनची डिझाईन समोर आली आहे. कंपनी 7 जुलै 2026 रोजी हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 प्रोसेसरसह 5,400mAh बॅटरी दिली जाऊ शकते. किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, कंपनी 30 हजार रुपयांच्या सेगमेंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करू शकते.

GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या

ओप्पो रेनो 16 सिरीज

ओप्पो जुलै महिन्याच्या सुरुवातीला त्यांची नवीन रेनो 16 सिरीज बाजारात लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी या सिरीजअंतर्गत ओप्पो रेनो 16 आणि ओप्पो रेनो 16 सी असे दोन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. लीक्सवर विश्वास ठेवला तर, ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन 60 हजार रुपये आणि ओप्पो रेनो 16 सी हा 50 हजार रुपयांच्या किंमतीत बाजारात लाँच केला जाऊ शकतो.

Web Title: These tech companies are planning to launch smartphones in july 2026 read in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

नव्या Samsung स्मार्टफोनची भारतात दमदार एंंट्री! 6000mAh बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स; किंमत तुमच्या बजेटमध्ये
1

नव्या Samsung स्मार्टफोनची भारतात दमदार एंंट्री! 6000mAh बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स; किंमत तुमच्या बजेटमध्ये

Scam Alert: IRCTC च्या नावाने सुरू आहे स्कॅम! गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट; तिकीट बुक करण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी
2

Scam Alert: IRCTC च्या नावाने सुरू आहे स्कॅम! गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट; तिकीट बुक करण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी

WhatsApp Update: युजर्सची प्रतीक्षा संपली! आता चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही; मेटाने रिलीज केलं नवं Username फीचर
3

WhatsApp Update: युजर्सची प्रतीक्षा संपली! आता चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही; मेटाने रिलीज केलं नवं Username फीचर

GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या
4

GTA 6 ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु! भारतात किती असणार किंमत? काय असणार खास? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.