Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Truecaller अडचणीत? TRAI ने सरकारकडे मागितले विशेष अधिकार; मंजुरी मिळाल्यास होऊ शकते मोठी कारवाई

TRAI: ट्रू कॉलर वापरणाऱ्या कोट्यवधी मोबाईल यूजर्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. ट्रायने सरकारकडे अधिकृत एजन्सीचा दर्जा मागितला असून, मंजुरी मिळाल्यास कॉल मॅनेजमेंट ॲप्सवर थेट कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. हे प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2026 | 09:09 AM
Truecaller अडचणीत? TRAI ने सरकारकडे मागितले विशेष अधिकार; मंजुरी मिळाल्यास होऊ शकते मोठी कारवाई

Truecaller अडचणीत? TRAI ने सरकारकडे मागितले विशेष अधिकार; मंजुरी मिळाल्यास होऊ शकते मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • ट्रायने आयटी ॲक्टअंतर्गत अधिकृत एजन्सीचा दर्जा देण्याची सरकारकडे मागणी केली आहे.
  • मंजुरी मिळाल्यास ट्रू कॉलर सारख्या कॉल मॅनेजमेंट ॲप्सवर कारवाई करण्याचा अधिकार ट्रायला मिळू शकतो.
  • 1600 नंबर सिरीजवरील सरकारी आणि नियामक कॉल्स ब्लॉक किंवा चुकीचे लेबल करू नयेत, असे ट्रायने स्पष्ट केले आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने आयटी ॲक्टअंतर्गत सरकारकडे अधिकृत एजन्सीच्या दर्जाची मागणी केली आहे. जर सरकारने ट्रायला अधिकृत एजन्सीचा दर्जा दिला तर ते ट्रू कॉलर सारख्या कॉल मॅनेजमेंट ॲप्सविरोधात कारवाई करू शकते. ट्रायने शुक्रवारी सांगितलं होतं की, कोणताही ॲप 1600 नंबर सीरीजवरून येणारे फोन कॉल ब्लॉक करू शकत नाही. हे नंबर सिरीज नियामक संस्था आणि सरकार नागरिकांशी संवाद साधण्यासाठी वापरतात.

मोबाईल यूजर्ससाठी खुशखबर! डेटा-फ्री रिचार्ज प्लॅन्स आता होणार स्वस्त… काय आहे TRAI चा नवा प्लॅन? जाणून घ्या

काय प्रकरण आहे?

ट्रायचे हे विधान कॉल मॅनेजमेंट ॲप ट्रू-कॉलरसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हे प्रकरण खास नंबर सिरीजवरून येणाऱ्या कॉल्सची ओळख पटवण्याबाबत आहे. सोमवारी इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयांच्या अधिकऱ्यांनी म्हटलं की, नियामक अधिकार क्षेत्राचा मुद्दा हा तांत्रिक स्वरूपाचा होता. असं सांगितलं जात आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ट्रायने केलेल्या मागणीचा विचार करत आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

गेल्या आठवड्यात ट्रायने स्पष्टपणे सांगितलं होतं की, 1600 नंबर सीरीजवरून येणारे कॉल्स कोणताही मोबाईल ॲप ब्लॉक करू शकत नाही आणि त्याला चुकीच्या नावाचा लेबल देखील देऊ शकत नाही. ही नंबर सिरीज सरकार आणि बँक, विमा कंपन्यांसारख्या नियामक संस्थांद्वारे लोकांपर्यंत महत्त्वाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ट्रायचं असं म्हणणं आहे की, या सरकारी आणि अधिकृत नंबर सिरीजची ओळख बदलल्याने किंवा त्यांना स्पॅमसारखे चुकीचे लेबल लावल्याने लोकांपर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्यात अडचणी येऊ शकतात. हा संपूर्ण विवाद विशेष नंबर सिरीजवरून येणाऱ्या कॉल्सचे लेबलिंग आणि ओळख याबाबत आहे.

ट्रायची मागणी काय आहे?

सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत, केवळ इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (14C) सारख्या काही विशिष्ट नियुक्त संस्थांनाच डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ॲप्सवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. ट्रायला देखील असाच दर्जा हवा आहे, जेणेकरून गरज पडल्यास कॉल मॅनेजमेंट ॲप्सवर कारवाई केली जाऊ शकते.

Airtel Recharge Plan: 199 रुपये की 219 रुपये? 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणता रिचार्ज प्लॅन ठरणार फायदेशीर? वाचा संपूर्ण तुलना

सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रायला हा अधिकार देण्याचा निर्णय कोणते मंत्रालय घेऊ शकते, याबाबत आता चर्चा सुरु आहे. दूरसंचार विभागाचे मत आहे की, हा निर्णय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने घेतला पाहिजे. तर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे असे मत आहे की, ते या प्रस्तावााची तपासणी करतील आणि त्यानंतर याप्रकरणी निर्णय घेतला जाईल.

Web Title: Trai demand special right from government to take strict action against truecaller

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • Truecaller

संबंधित बातम्या

सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
1

सावधान! फक्त ५ रुपयांत विकला जातो तुमचा मोबाईल नंबर? सायबर फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे
2

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral
3

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral

Tech Tips: फोन चोरी झाला? घाबरू नका… लगेच करा ही 3 कामं, नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं
4

Tech Tips: फोन चोरी झाला? घाबरू नका… लगेच करा ही 3 कामं, नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.