Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रंपच्या T1 स्मार्टफोनने लोकांना दिला धोका? चक्क लाँचिंगनंतर बदलले डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स, नक्की गडबड काय?

लाँच झाल्यापासून आतापर्यंत T1 स्मार्टफोन प्रचंड चर्चेत आहे. ट्रंप ऑर्गनाइजेशनने लाँच केलेला T1 स्मार्टफोन आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा वाद नेमका काय आहे, त्याची कारण काय आहेत याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2025 | 10:28 AM
ट्रंपच्या T1 स्मार्टफोनने लोकांना दिला धोका? चक्क लाँचिंगनंतर बदलले डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स, नक्की गडबड काय?

ट्रंपच्या T1 स्मार्टफोनने लोकांना दिला धोका? चक्क लाँचिंगनंतर बदलले डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स, नक्की गडबड काय?

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रंप यांच्या ट्रंप ऑर्गनाइजेशनने एक नवीन T1 स्मार्टफोन लाँच केला होता. लाँच केल्यापासून आतापर्यंत हा स्मार्टफोन प्रचंड चर्चेत आहे. लाँचिंगवेळी स्मार्टफोनच्या मॅन्युफॅक्चरिंगबाबत आरोप प्रत्यारोप सुरु होते. मात्र आता स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.’

तुमच्या अकाऊंटचा Password तर लिक झाला नाही ना? कसं कराल चेक? या 4 स्टेप्स करणार तुमची मदत

T1 स्मार्टफोन लाँच केला तेव्हा कंपनीने असं सांगितलं होतं की, हा स्मार्टफोन ‘मेड इन यूएसए’ आहे. मात्र त्यानंतर समोर आलेल्या माहितीमुळे सर्वच चकित झाले. याशिवाय स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत देखील आता वाद सुरु झाला आहे. फोनच्या अधिकृत वेबसाईटवरून ‘मेड इन अमेरिका’ वाला टॅग आता हटवण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – X)

आता स्मार्टफोनवर ‘मेड इन अमेरिका’ नाही तर एक नवीन स्लोगन पाहायला मिळत आहे. आता T1 स्मार्टफोन प्रीमियम परफॉर्मेंस, प्राउडली अमेरिकन या नव्या टॅगसह उपलब्ध झाला आहे. या नव्या टॅगलाईनमुळे आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, फोन अमेरिकेत मॅन्युफॅक्चर करण्यात आलेला नाही. हा स्मार्टफोन केवळ अमेरिकेत डिझाईन करण्यात आला असल्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे. त्यामुळे आता अनेकांना धक्का बसला आहे. एवढंच नाही तर स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत देखील वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. लाँचिंगपूर्वी स्मार्टफोनचे जे स्पेसिफिकेशन्स सांगण्यात आले होते, त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

सुरुवातीला कंपनीने असा दावा केला होता की, T1 फोनमध्ये 6.78 इंचचा AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. मात्र आता वेबसाईटला भेट दिल्यानंतर असं समजत आहे की, स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा आकार कमी करून 6.25 इंच करण्यात आला आहे. म्हणजेच डिस्प्लेचा जो आकार आधी सांगण्यात आला होता, त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. याशिवाय स्मार्टफोनच्या रॅमबाबत असं सांगण्यात आलं होत की, या डिव्हाईसमध्ये 12GB रॅम असणार आहे. मात्र आता वेबसाईटवर रॅमबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. काही तज्ज्ञांनी असं देखील सांगितलं आहे की, स्मार्टफोनचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ती डिझाईन आणि लाँच करण्यात आलेल्या प्रोडक्टच्या डिझाईनमध्ये काहीसा बदल पाहायला मिळत आहे.

I’m not a robot: एका वाक्यावर क्लिक करताच कसं समजतं तुम्ही माणूस आहात की रोबोट? या स्मार्ट प्रोसेसमध्ये दडलंय बरंच काही

हा स्मार्टफोन जेव्हा लाँच झाला तेव्हा एका तज्ज्ञाने सांगितलं होतं की, या स्मार्टफोनचे मॅन्युफॅक्चर अमेरिकेत करण्यात आलेले नाही. हा स्मार्टफोन चीनसारख्या कोणत्याही थर्ड पार्टी फॅक्ट्रीमध्ये तयार करण्यात आलं असण्याची शक्यता आहे. कारण स्मार्टफोनचे सर्व भाग एकाच देशात बनवणे जवळजवळ अशक्य आहे. पुरवठा साखळीत अनेक देशांचा वाटा आहे. स्मार्टफोनवर केले जाणारे आरोप प्रत्यारोपांचा विचार करता आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, ट्रंप ऑर्गनाइजेशनने लोकांची फसवणूक केली आहे का? असं करण्यामागे नेमकं कारण काय आहे? सोशल मीडियावर याबाबत अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. शिवाय ग्राहक देखील असे अनेक प्रश्न विचारत आहेत.

Web Title: Trump t1 smartphone changed specifications after launching know in detail tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • Donald Trump
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
3

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
4

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.