Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: स्मार्टफोन मार्केट तापणार! जून महिन्यात लाँच होणार हे तगडे 5G डिव्हाईस… इथे वाचा यादी

Upcoming Smartphones In June 2026: जून महिन्याक टेक कंपन्या अनेक नवीन आणि दमदार स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. यातील काही स्मार्टफोन्सचे फीचर्स देखील समोर आले आहेत. त्यामुळे जर तुम्ही आता नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल ही तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2026 | 10:47 AM
Upcoming Smartphones: स्मार्टफोन मार्केट तापणार! जून महिन्यात लाँच होणार हे तगडे 5G डिव्हाईस... इथे वाचा यादी

Upcoming Smartphones: स्मार्टफोन मार्केट तापणार! जून महिन्यात लाँच होणार हे तगडे 5G डिव्हाईस... इथे वाचा यादी

Follow Us
Follow Us:
  • जूनच्या पहिल्या आठवड्यात लावा ब्लेझ एन2 5जी, मोटोरोला एज 70 प्रो+ आणि शाओमी 17 टी सारखे स्मार्टफोन्स बाजारात दाखल होणार आहेत.
  • रेडमी टर्बो 5, iQOO Z11 5G आणि वीवो T5 लाइट मध्ये मोठी बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
  • सॅमसंग गॅलेक्सी एम47, गॅलेक्सी ए27 आणि रियलमी पी4आर सारखे स्मार्टफोन्सही जून-जुलैमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
जून महिना स्मार्टफोन प्रेमींसाठी अतिशय खास असणार आहे. कारण जून महिन्यात भारतात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. ज्यामध्ये Motorola Edge 70 Pro+ पासून Xiaomi 17T, Lava Blaze N2 5G, iQOO Z11 5G, Redmi Turbo 5, OPPO Reno 16 सीरीजपर्यंत अनेकांचा समावेश असणार आहे. प्रीमियम डिस्प्ले, मोठी बॅटरी, पावरफ़ुल प्रोसेसर आणि कॅमेरा अपग्रेडसह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री होणार आहे.

Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल

LAVA Blaze N2 5G

हा स्मार्टफोन 3 जून रोजी लाँच केला जाणार आहे. अँड्रॉईड 16 वर आधारित असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच एचडी+ 90Hz डिस्प्ले, यूनिसोक प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि IP64 रेटिंग मिळणार आहे. 13MP डुअल रियर कॅमेरा आणि आरामदायक डिझाईन यामुळे हा फोन ‘मेक इन इंडिया’ च्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. या नव्या स्मार्टफोनची किंमत 8 ते 10 हजार रुपयांदरम्यान असू शकते.

Motorola Edge 70 Pro+

मोटोरोलाचा हा नवीन स्मार्टफोन भारतात 4 जून रोजी लाँत केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे, ज्यामध्ये 2772×1272 रिजॉल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 5200 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट असणार आहे. यामध्ये पॅनटोन वॅलिडेटेड कलर, वॉटर टच टेक्नोलॉजी आणि SGS सर्टिफिकेशन समाविष्ट असणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Xiaomi 17T

नवीन Xiaomi 17T देखील 4 जून रोजी लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंसिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर, 6500mAh बॅटरी आणि 67W चार्जिंगने सुसज्ज असणार आहे. यामध्ये 5x ऑप्टिकल झूमसह Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे.

Redmi Turbo 5 आणि Redmi 17 5G

18 जून रोजी कंपनी हे दोन्ही स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. Redmi Turbo 5 मध्ये डाइमेंसिटी 8500 अल्ट्रा, 7560mAh बॅटरी, 100W चार्जिंग, 6.59-इंच 120Hz अमोलेड डिस्प्ले आणि 50MP OIS कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनची किंमत 27,999 ते 33,999 दरम्यान असू शकते. तर Redmi 17 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 4-सीरीज प्रोसेसर, 7000mAh+ बॅटरी आणि 50MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.

iQOO Z11 5G

हा स्मार्टफोन देखील जून महिन्यात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6.83-इंच अमोलेड 165Hz डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर, 8GB रॅम+ 256GB स्टोरेज, 9020mAh बॅटरी आणि 90W चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 50MP सोनीआईएमएक्स 882 ओआईएस कॅमेरा आणि 32MP चा सेल्फी दिला जाऊ शकतो. आगामी स्मार्टफोनची किंमत 25,000 रुपये ते 30,000 रुपयांदरम्यान असू शकते.

साऊंडच्या दुनियेत नवा धमाका! 55dB नॉईज कँसलेशनसह Vivo चे नवीन ईअरबड्स लाँच… 55 तासांपर्यंत चालणार बॅटरी

Vivo T5 Lite

15 हजारांहून कमी किंमतीत कंपनी हा स्मार्टफोन जून महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर आणि 5600mAh बॅटरी असू शकते. हा फोन IP65 रेटिंगसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy M47 आणि A27

हे दोन्ही स्मार्टफोन्स जून – जुलैमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या स्मार्टफोन्सबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

Realme P4R

या फोनमध्ये डाइमेंसिटी 7400+ AI प्रोसेसरचा वापर केला जाण्याची शक्यता आङे. हा फोन देखील जूनमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.,

Web Title: Upcoming smartphones in month of june including vivo t5 lite and xiaomi 17t

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • motorola
  • Redmi
  • smartphone

संबंधित बातम्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
1

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
2

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
3

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
4

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.