Bluetooth च्या नावामागचं रहस्य उलगडलं! टेक्नॉलॉजी नाही, एका राजाने दिली ओळख? इतिहास वाचून तुम्हीही थक्क व्हाल
WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही
ब्लूटूथचे नाव 10 व्या शतकातील एका स्कँडिनेव्हियन राजाच्या (डेन्मार्क, स्वीडन आणि नॉर्वे) नावावरून ठेवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, राजा हॅराल्ड ब्लूटूथ गॉर्मसन यांच्या नावावरून ब्लूटूथचे नाव ठेवण्यात आले आहे. त्यांनी 958 ते 985 पर्यंत डेनमार्क आणि नॉर्वेवर राज्य केले होते. राजा डेनमार्क आणि नॉर्वेच्या काही भागांना एकत्र आणण्यासाठी ओळखले जात होते.
इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा हेराल्ड यांनी वेगवेगळ्या जमाती आणि प्रदेशांना एकत्र आणण्यासाठी काम केले. यामुळेच जेव्हा एक नवीन वायरलेस तंत्रज्ञान विकसित केले जात होते, त्यावेळी इंजिनिअर्सना असे वाटले की, हे तंत्रज्ञान देखील वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसना एकत्र जोडण्याचे काम करेल. याच कारणामुळे या तंत्रज्ञानाचे नाव ब्लूटूथ असे ठेवण्यात आले. (फोटो सौजन्य – Pinterest)
राजा हॅराल्ड यांना ‘ब्लूटूथ’ हे टोपणनाव स्वरुपात मिळाले होते. असे सांगितलं जात होते की, त्यांच्या एका दाताचा रंग गडद निळा किंवा काळा दिसत होता, याच कारणामुळे त्यांना ब्लू टूथ म्हटलं जात होतं. तथापी, इतिहासात यामागे वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. मात्र राजा हॅराल्ड यांना मिळालेले हेच टोपणनाव कालांतराने जगातील सर्वात लोकप्रिय वायरलेस तंत्रज्ञानाचे नाव बनले.
1990 व्या दशकात जेव्हा अनेक कंपन्या मिळून एका शॉर्ट-रेंज वायरलेस कम्युनिकेशन स्टँडर्डवर काम करत होती, तेव्हा इंटेलच्या एक इंजीनियरने या नावाचा सल्ला दिला होता. त्यावेळी हे केवळ एक तात्पुरते सांकेतिक नाव मानले जात होते. जेव्हा या तंत्रज्ञानासाठी अंतिम नाव ठेवण्याची वेळ आली तेव्हा ब्लूटूची लोकप्रियता प्रचंड वाढली होती आणि यामुळेच याला कायमचे नाव म्हणून निवडले गेले.
HONOR 600 सीरीज लाँच! 8000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेरा पाहून यूजर्स उत्साहित… जाणून घ्या किंमत
तुम्ही कधी ब्लूटूथचा लोगो काळजीपूर्वक पाहिला आहे का? त्याचे चिन्ह काही सामान्य रचना नाही. हा लोगो नॉर्डिक रूनिक अक्षरांचे मिश्रण आहे. हे मिश्रण राजा हॅराल्ड ब्लूटूथ यांच्या नावाचे सुरुवातीचे अक्षरं H आणि B यांना दर्शवतात. म्हणजेच ब्लूटूथचे केवळ नावाच नाही तर त्याचा लोगो देखील ऐतिहासिक राजासंबंधित आहे.
Ans: ब्लूटूथ हे एक वायरलेस तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे दोन किंवा अधिक उपकरणांमध्ये डेटा ट्रान्सफर करता येतो.
Ans: ब्लूटूथ हे नाव Harald Bluetooth या डेन्मार्कच्या राजावरून ठेवण्यात आले आहे.
Ans: हेडफोन्स, इअरबड्स, स्पीकर्स, स्मार्टवॉच, कीबोर्ड आणि स्मार्टफोन जोडण्यासाठी ब्लूटूथचा वापर केला जातो.






