
नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड
VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर
खोटी कागदपत्रे वापरून सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांंना आता तीन वर्षांपर्यंत कारावास, 50 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शिवाय अशा गुन्ह्याचा प्रयत्न, त्यासाठी मदत करणे किंवा कट रचण्यालाही कायद्यानुसार शिक्षा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. नागरिकांची होणारी फसवणूक आणि इतर गंभीर गुन्हे लक्षात घेऊन सरकराने हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
BSNL Recharge Plan: कंपनीची नवीन फ्रीडम ऑफर! केवळ 150 रुपयांत मिळणार ओटीटी फायदे आणि बरंच काही…
कधीही तुमचे सिम कार्ड कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यासाठी देऊ नका. जर तुम्ही असे करत असाल तर तुमच्या सिम कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. जर तुमच्या सिम कार्डचा गैरवापर झाला किंवा तुमच्या सिम कार्डचा वापर करून एखाद्या व्यक्तीची फसवणूक करण्यात आली तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
काही लोक सिम कार्ड बदलण्यासाठी स्कॅमर्सच्या जाळ्यात देखील अडकू शकतात. यामुळे स्कॅमर्स तुमचा फोन किंवा तुमचे बँक अकाउंट हॅक करून तुमच्याकडून पैसे उकळू शकतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला दुसरे सिम कार्ड खरेदी करायचे असेल किंवा तुमचे सिम कार्ड बदलायचे असेल तर नेहमी अधिकृत टेलिकॉम कंपन्यांसोबत संपर्क साधा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून नव्या सिम कार्डची खरेदी करणं किंवा जुने सिम बदलणं अतिशय धोकादायक असू शकतो.
कधीही तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड इन्सर्ट करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडे फोन किंवा सिम कार्ड देऊ नका. कारण सध्या डुप्लिकेट सिम कार्डमुळे लोकांची फसवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत समोरील व्यक्ती तुमच्या सिम कार्डचे क्लोन तयार करू शकतो म्हणजेच तुमच्या सिम कार्डसारखे दिसणारे हुबेहुब दुसरे सिम कार्ड तयार करू शकतो आणि त्यानंतर सिम कार्डचा गैरवापर केला जाऊ शकतो.
जर तुमच्या सिम कार्डमध्ये कोणतेही समस्या आली असेल तर नेहमी कस्टमर केअरला कॉल करा. अनेक लोकं असे करत नाहीत आणि यामुळे फसवणुकीचे शिकार होतात. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी सिम कार्ड ठेवून विसरून जात असाल अशा परिस्थितीत दुसरा एखादा व्यक्ती तुमच्या सिम कार्डचा चुकीचा वापर करू शकतो. यामुळे तुम्हाला दंड किंवा तुरूंगवास यासारख्या शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या सिम कार्डबाबत नेहमी सतर्क करा.