VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर
व्होडाफोन आयडियाने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 200 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना कंपनीच्या कंटेंट एग्रीगेशन प्लॅटफॉर्म व्हीआय मुव्हीज अँड टीव्हीचे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. यामुळे यूजर्सना 20 ओटीटी प्लॅटफॉर्म आणि 200 हून अधिक लाईव्ह टिव्हीचा ॲक्सेस मिळणार आहे. यासोबतच यूजर्स 30 जीबी हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5जी डेटाचा वापर करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
व्हिआयचं असं म्हणणं आहे की, या सिंगल रिचार्जद्वारे यूजर्स मल्टीपल स्ट्रीमिंग सर्विस ॲक्सेस करू शकणार आहेत. यामुळे यूजर्सना वेगवेगळ्या ओटीटी सब्सक्रिप्शनसाठी पेमेंट करावे लागणार आहेत. या प्लॅनबाबत व्होडाफोन आयडियाचं असं म्हणणं आहे की, याची किंमत केबल टिव्ही आणि डीटीएचचे मंथली सब्सक्रिप्शनपेक्षा अनेक पटींनी कमी आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना जिओ हॉटस्टार, सोनीलिव्ह, झी5, लायन्सगेट प्ले, शेमारूमी, मनोरमा मॅक्स, फॅनकोड, प्लेफ्लिक्स, क्लिक, अतरंगी, चौपाल, ओटीटीप्ले लाइव्ह, पॉकेट फिल्म्स, यपटीव्ही, ॲडाटाइम्स, कांचा लंका, टाइम्सप्ले, नेक्स्टजीटीव्ही इत्यादी ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस मिळतो. या सर्व ॲप्समधील कंटेंट यूजर्स व्हीआय मुव्हीज अँड टीव्ही ॲपवर पाहू शकतात.
व्होडाफोन आयडियाचं असं म्हणणं आहे की, या प्लॅनद्वारे यूजर्स 15 भाषांचा कंटेट ॲक्सेस करू शकणार आहेत. याशिवाय, ॲप एकाचवेळी 4 वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये लॉगिन केले जाऊ शकते. मात्र, ओटीटी ॲप्स एका वेळी फक्त दोन स्क्रीनवर चालतील, तर सोनीलिव्ह एका वेळी फक्त एकाच स्क्रीनवर चालेल.






