व्ह्यूसॉनिक कंपनी (फोटो- सोशल मिडिया)
एलइडी डिस्प्ले श्रेणीत व्ह्यूसॉनिक ही भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या ब्रँड्सपैकी एक ठरली असून कंपनीने वार्षिक ५० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. ही वाढ बाजारात या सोल्यूशन्सना असलेल्या वाढत्या मागणीचे प्रतीक आहे. कंपनीचा प्रो एव्ही पोर्टफोलिओ स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर्स, बोर्डरूम, प्रोफेशनल वर्कस्पेस, रिटेल स्पेस, ट्रेनिंग रूम आणि मोठ्या सोहळ्यांचे हॉल यांसारख्या विविध परिसरांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे.
स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
व्ह्यूसॉनिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मुनीर अहमद म्हणाले, “भारतातील आमची उपस्थिती आणि आम्ही पुरवत असलेल्या सोल्यूशन्सची व्याप्ती या दोन्ही बाबींमध्ये व्ह्यूसॉनिकने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आज आमचा पोर्टफोलिओ एलइडी, कोलॅबरेशन, कमर्शियल डिस्प्ले, प्रोफेशनल मॉनिटर्स, प्रोजेक्टर्स आणि स्मार्ट डिस्प्ले सोल्यूशन्सपर्यंत विस्तारला आहे. ग्राहकांना आणि भागीदारांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार योग्य तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, तसेच त्याची उभारणी व व्यवस्थापन अधिक सोपे करणे यावर आमचा मुख्य भर आहे.”
नवीन डायरेक्ट व्ह्यू एलइडी सोल्यूशन्स: व्ह्यूसॉनिकने भारतासाठी दोन नवीन सोल्यूशन्स सादर केले आहेत: एलडीसी०२७-१८२ (स्मार्ट सिटी कमांड सेंटर्ससाठी, डॅशबोर्ड, सर्व्हिलान्स फीड व डेटाच्या सीमलेस विझ्युअलायझेशनसाठी) आणि एलडीसी०२७जी-०९१सी (प्रीमियम रिटेलसाठी, फ्लिप चिप सीओबी तंत्रज्ञान, ०.९४ मिमी पिक्सेल पिच, ६०० निट्स ब्राइटनेस, ३,८४० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ९९% स्क्रीन-टू-बॉडी रेशिओसह). यासोबतच जलद सेटअप व पोर्टेबिलिटीसाठी फोल्डेबल ऑल-इन-वन एलइडी डिस्प्ले देखील सादर करण्यात आला आहे.
कोलॅबरेशन आणि वर्कस्पेस सोल्यूशन्स: मीटिंग रूम्ससाठी इनबिल्ट कंट्रोल व इमेज-स्टिचिंग क्षमता असलेली एलडीई सिरीज (१०८, १३६ आणि १६३-इंच) सादर झाली आहे. मल्टीटास्किंगसाठी १०५-इंच ५के व्ह्यूबोर्ड आयएफपी१०५युडब्ल्यू-एन (२१:९ एस्पेक्ट रेशिओ), तसेच कार्यस्थळासाठी व्हीजी१४५७ (ड्युअल-स्क्रीन फोल्डेबल मॉनिटर) आणि व्हीपी३४५६ए (३४-इंच अल्ट्रावाइड मॉनिटर) हे नवीन उत्पादने सादर करण्यात आले आहेत.
कमर्शियल, रिटेल आणि प्रोजेक्टॉर सोल्यूशन्स: सीएन५५०१-१एन डिस्प्ले २४/७ प्लेबॅक, कंटेंट शेड्यूलिंग आणि ॲअरप्ले, मिराकास्ट व क्रोमकास्ट वायरलेस कास्टिंगला सपोर्ट करतो. रिटेल व किऑस्कसाठी लवचिक ओपन फ्रेम सोल्यूशन्स आणि व्यवसाय व शिक्षणासाठी ६,००० एएनएसआय ल्युमेन्स, डब्ल्यूएक्सजीए रिझोल्यूशन व ३६०-डिग्री प्रोजेक्टॉर क्षमता असलेला एलएससी६००डब्ल्यूयू-एसटी लेझर प्रोजेक्टॉर उपलब्ध करण्यात आला आहे.
गूगल टीव्ही सिरीज व प्रो एव्ही इकोसिस्टम: हॉस्पिटॅलिटी, मीटिंग रूम्स व डिजिटल साइनेजसाठी ३२ ते ६५-इंच आकारांत गूगल टीव्ही सिरीज (गूगल टीव्ही रेफ+ ५.० व अँड्रॉइड १४ संचालित) लाँच झाली आहे. इन्फोकॉम इंडिया २०२६ मधील हे प्रदर्शन केवळ वैयक्तिक उत्पादनांपेक्षा कमांड सेंटर्स, वर्कप्लेस आणि रिटेलसाठी एकात्मिक प्रो एव्ही इकोसिस्टम तयार करण्याच्या व्ह्यूसॉनिकच्या धोरणात्मक बदलाला अधोरेखित करते.






