लवकरच लाँच होणार Vivo चा 32MP सेल्फी कॅमरा आणि 5000 mAh बॅटरी वाला 5G स्मार्टफोन
Vivo नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. Vivo Y300+ 5G नावाचा फोन मॉडेल क्रमांक V2422 सह IMEI डेटाबेसमध्ये दिसला आहे. लाँच होण्यापूर्वी फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचे डिटेल्सही समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच कंपनीने Vivo V40e हा नवीन स्मार्टफोन लाँच केला होता.
हेदेखील वाचा- परवडणाऱ्या किंमतीत लवकरच लाँच होणार Vivo चा नवीन स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंगने सुसज्ज
रिपोर्ट्सनुसार, Vivo Y300 Plus 5G मध्ये 6.78-इंचाचा OLED डिस्प्ले असेल जो FHD+ रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. सुरक्षेसाठी यात इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो. Y300 Plus च्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये 50MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP सेकेंडरी सेन्सर असण्याची अपेक्षा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा असल्याचे सांगितले जाते. (फोटो सौजन्य – pinterest)
स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट Vivo Y300+ 5G स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असेल. जे 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजसह जोडले जाईल. या स्मार्टफोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी असेल. फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर बूस्ट करेल. पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला IP54 रेटिंग मिळालेली असण्याची शक्यता आहे.
Vivo Y300+ 5G च्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये असण्याची अपेक्षा आहे. डिव्हाइसची लाँच तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या महिन्यात हा फोन भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.
हेदेखील वाचा- Vivo आणि Motorola स्मार्टफोनमध्ये येतेय ग्रीन लाइन; वैतागलेल्या युजर्सची कंपनीकडे तक्रार
Vivo सध्या Vivo v50 सिरीजवर देखील काम करत आहे. Vivo v50 हा स्मार्टफोन Vivo V40 चा उत्तराधिकारी म्हणून लाँच केले जाईल. काही दिवसांपूर्वी कंपनीने Vivo V40e देखील लाँच केला आहे. Vivo v50 सीरीज लाँच होण्यापूर्वी अनेक स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.
कंपनी या सिरीजअंतर्गत Vivo V50 आणि Vivo V50e वर काम करत असल्याची माहिती आहे. V50 मॉडेल क्रमांक V2427 अंतर्गत सूचीबद्ध आहे आणि Vivo V50e मॉडेल क्रमांक V2428 अंतर्गत सूचीबद्ध आहे. या स्मार्टफोमन्सच्या कॅमेरा सेन्सरमध्येही बदल केले जाऊ शकतात. पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ही सिरीज लाँच केली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. कारण कंपनीने मागील सीरीज जून 2024 मध्ये आणि Vivo V30 सीरीज फेब्रुवारी 2024 मध्ये लाँच केली होती.
Vivo V40e मध्ये MediaTek Dimensity 7300 SoC प्रोसेसर दिला आहे. हँडसेटच्या चार्जिंगसाठी यामध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W चार्जिंगला सपोर्ट करते. Vivo चा हा फोन दोन कॉन्फिगरेशन मध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 28,999 रुपये किंमतीत येतो. तर त्याच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. हा हँडसेट मिंट ग्रीन आणि रॉयल ब्राँझ या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.