Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन खरेदीचा बजेट बिघडणार! Vivo T5x आणि iQOO Z11x च्या किंमती वाढल्या, आता मोजावे लागणार इतके पैसे

Vivo T5x and iQOO Z11x Price Hike: शाओमी आणि ओप्पोनंतर आता विवो आणि आयक्यूओओने देखील त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 02, 2026 | 12:29 PM
स्मार्टफोन खरेदीचा बजेट बिघडणार! Vivo T5x आणि iQOO Z11x च्या किंमती वाढल्या, आता मोजावे लागणार इतके पैसे

स्मार्टफोन खरेदीचा बजेट बिघडणार! Vivo T5x आणि iQOO Z11x च्या किंमती वाढल्या, आता मोजावे लागणार इतके पैसे

Follow Us
Follow Us:
  • विवो टी 5 एक्स 5जी ची नवीन किंमत ₹27,999 पासून सुरू होत असून, टॉप व्हेरिअंटसाठी ₹34,999 मोजावे लागणार आहेत.
  • आयक्यूओओ झेड 11 एक्स 5जी ची सुरुवातीची किंमत ₹24,999 झाली असून, टॉप व्हेरिअंट आता ₹30,999 ला मिळणार आहे.
  • दोन्ही फोनच्या किमतीत लॉन्चच्या तुलनेत मोठी वाढ झाली असून, कंपन्यांनी पुन्हा ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे.
टेक कंपन्या सतत त्यांच्या डिव्हाईसच्या किंमतीत वाढ करत असतात. यामुळे सामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. अलीकडेच शाओमी आणि ओप्पोने त्यांच्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता विवोने आणि आयक्यूओओने देखील त्यांच्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. ज्यामध्ये Vivo T5x 5G आणि iQOO Z11x 5G यांचा समावेश आहे. दोन्ही कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईट्सवर या दोन्ही फोन्सच्या सर्व मॉडेल्सच्या नवीन किंमती पाहायला मिळत आहे. आता विवो टी 5 एक्स 5जी ची किंमत वाढून 34,999 रुपये झाली आहे. तर आयक्यूओओ झेड 11 एक्स 5जी च्या बेस व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपयांपासून सुरु होणार आहे. कंपन्यांनी फोन्सच्या किंमती 4 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहे.

फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच

विवो टी 5 एक्स 5 जी आणि आयक्यूओओ झेड 11 एक्स 5 जी

विवोच्या अधिकृत वेबसाईटवर आता विवो टी 5 एक्स 5जी च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये झाली आहे. या डिव्हाईसच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये झाली आहे. हे स्मार्टफोन्स साइबर ग्रीन, फ्यूजन रेड आणि स्टार सिल्वर कलर ऑप्शन्समध्ये खेरदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

विवो टी 5 एक्स 5 जी फिचर्स

विवोने हा फोन मार्च महिन्यात भारतात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी, या डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली होती. तर 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली होती. यानंतर, कंपनीने या डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंंमत 24,999 रुपये, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंंमत 27,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंंमत 30,999 रुपयांपर्यंत वाढवली होती. मात्र आता पुन्हा एकदा कंपनीने या व्हेरिअंटच्या किंमती वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

विवो टी 5 एक्स 5 जी अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिनओएस 6 वर चालतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्सच्या पीक ब्राइटनेससह 6.76-इंच की फुल-एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो प्रोसेसर, 50-मेगापिक्सेल सोनी IMX852 मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सेल बोकेह कॅमेरा आणि 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी दिली आहे. यासोबतच या फोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 आणि IP69 रेटिंग दिली आहे.

आयक्यूओओ झेड 11 एक्स 5 जीची नवीन किंमत

आयक्यूओओ झेड 11 एक्स 5 जी च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 24,999 रुपये झाली आहे. 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये झाली आहे. हा स्मार्टफोन प्रिज्मॅटिक ग्रीन आणि टाइटन ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. मार्चमध्ये लाँचिंगवेळी, आयक्यूओओ झेड 11 एक्स 5जी च्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत 18,999 रुपये होती, 8GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये होती आणि 8GB + 256GB मॉडेलची किंमत 22,999 रुपये होती. लाँचिंगनंतर कंपनीने या स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत देखील अनेकदा बदल केला असल्याचे सांगितलं जात आहे.

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

आयक्यूओओ झेड 11 एक्स 5 जी मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्स पीक ब्राइटनेस वाली 6.76-इंच फुल-एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. या स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 वर चालतो. कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 टर्बो चिपसेट देण्यात आला आहे. बॅकअपसाठी या डिव्हाईसमध्ये 44W चार्जिंग सपोर्टसह 7,200mAh बॅटरी दिली आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्राइमरी लेंस, 2-मेगापिक्सल बोकेह सेंसर आणि 32-मेगापिक्सेलचा फ्रंट शूटर देण्यात आला आहे. हा फोन IP68 आणि IP69+ रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे.

Web Title: Vivo t5x and iqoo z11x prices increases by companies once again know the news prices tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच
1

फ्लॅगशिप फोनच्या शर्यतीत Poco ची एंट्री! नव्या सिरीजने वेधलं सगळ्यांचं लक्ष, फीचर्स एकदा पाहाच

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
2

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
3

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
4

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.