Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोटोग्राफी होणार अधिक दमदार! Vivo च्या नव्या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा, यूजर्स झाले आनंदी

Vivo V70 FE Launched: कंपनीने दावा केला आहे की, स्मार्टफोनमध्ये AI-बेस्ड इमेजिंग फीचर्स आणि 6 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत. स्मार्टफोनचा कॅमेरा विशेष आकर्षण ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2026 | 09:49 AM
फोटोग्राफी होणार अधिक दमदार! Vivo च्या नव्या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा, यूजर्स झाले आनंदी

फोटोग्राफी होणार अधिक दमदार! Vivo च्या नव्या स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा, यूजर्स झाले आनंदी

Follow Us
Follow Us:
  • Vivo V70 FE स्मार्टफोन 37,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत भारतात लाँच करण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी, 90W फास्ट चार्जिंग आणि 120Hz OLED डिस्प्ले मिळतो.
Vivo Smartphone Launched: टेक कंपनी विवोने भारतात एक मोठा धमाका केला आहे. कंपनीने त्यांच्या V सीरीज अंतर्गत Vivo V70 FE नावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने मिडरेंज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन फोटोग्राफी लवर्ससाठी अतिशय खास ठरणार आहे. कारण या डिव्हाईसमध्ये 200-मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. या नव्या डिव्हाईसमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहे. नव्या Vivo V70 FE मध्ये एक मोठा OLED डिस्प्ले आणि 7,000mAh बॅटरी आहे. एवढंच नाही तर या डिव्हाईसमध्ये पावरफुल प्रोसेसर देखील आहे. त्यामुळे केवळ 40 हजार रुपयांच्या किंमतीत हा स्मार्टफोन पावरफुल प्रोसेसर, दमदार कॅमेरा आणि तगड्या बॅटरीचे एक परफेक्ट कॉम्बिनेशव असणार आहे.

7000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्ले… केवळ 26,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत Honor चा नवा स्मार्टफोन लाँच

Vivo V70 FE ची किंमत आणि उपलब्धता

विवोचा नवीन स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 8GB + 128GB या व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 40,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 44,999 रुपये ठेवली आहे. तुम्ही हा फोन मॉनसून ब्लू आणि नॉर्दर्न लाइट्स पर्पल रंगांमध्ये खरेदी करू शकाल. या फोनची पहिली विक्री 9 एप्रिल रोजी ॲमेझॉन आणि विवो इंडियाच्या वेबसाइटवर सुरू होणार आहे. (फोटो सौजन्य – Vivo) 

Vivo V70 FE चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Vivo V70 FE मध्ये 6.83-इंच 1.5K OLED डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे. विवोच्या या नवीन डिव्हाईसमध्ये 1,900 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेससह HDR10+ सपोर्ट दिला आहे.

प्रोसेसर

नवीन विवो स्मार्टफोन 4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो चिपसेटने सुसज्ज आहे. यासोबतच फोनमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर5 रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळत आहे.

कॅमेरा फीचर्स

Vivo V70 FE मध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. कॅमेरा स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण असणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन देखील दिले आहे. फोनमध्ये दुसरा कॅमेरा 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. या हँडसेटमध्ये एआय मॅजिक वेदर, एआय मॅजिक लँडस्केप आणि एआय फोर-सीझन पोर्ट्रेट यांसारखी अनेक खास वैशिष्ट्ये देखील आहेत.

Flipkart Big Bachat Days: अवघे काही शिल्लक! डिस्काऊंटसह खरेदी करा एसी, टिव्ही आणि बरंच काही; जाणून घ्या ऑफर्स

बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट

तसेच या विवो स्मार्टफोनमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि बाईपास चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Vivo v70 fe launched in india in mid range segment smartphone is equipped with 200mp camera tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
1

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स
2

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
3

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
4

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.