
Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी
भारतात नवीन विवो स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 6GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी एसबीआय, आयडीएफसी फर्स्ट बँक, ॲक्सिस बँक, येस बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा आणि इंडसइंड बँक कार्ड्सवर 1,500 रुपयांचे इंस्टंट कॅशबॅक देखील ऑफर करणार आहे. भारतात हा नवीन स्मार्टफोन फ्लिपकार्ट, विवो इंडिया ऑनलाइन स्टोर आणि दूसरे ऑफलाइन रिटेल चॅनल्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा लेटेस्ट लाँच स्मार्टफोन क्रिमसन रेड, गोल्डन मिस्ट आणि सीशोर कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Vivo)
नवीन विवो वाय 31 टी 5जी हा एक डुअल-सिम हँडसेट आहे, जो अँड्रॉईड 16 वर आधारित विवोच्या लेटेस्ट ओरिजीनओएस 6 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच एचडी+ (720 x 1,608 पिक्सेल) एलसीडी टचस्क्रीन दिली आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 1,250 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि 83 टक्के NTSC कलर गॅमेट दिले आहे. टेक कंपनीने दावा केला आहे की, डिव्हाईसला पाणी आणि धूळीपासून संरक्षाणासाठी IP68 + IP69 रेटिंग्स मिळाली आहे.
परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे, ज्यामध्ये 1.95GHz वर क्लॉक्ड सहा एफिशिएंसी कोर्स आणि 2.2GHz ची पीक क्लॉक स्पीड देणारे दोन परफॉर्मंस कोर्स समाविष्ट आहे. यामध्ये 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 3.1 इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या विवो डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा प्रायमरी शूटर आणि 2-मेगापिक्सेल (f/2.4) चा बोकेह सेंसर समाविष्ट आहे. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये समोरील बाजूला 8-मेगापिक्सेल (f/2.05)चा कॅमेरा दिला आहे. रिअर कॅमेऱ्यामध्ये नाइट, पोर्ट्रेट, वीडियो, लाइव फोटो, स्लो-मो, टाइम-लॅप्स, प्रो आणि पैनोसारखे मोड्स दिले आहेत.
विवोने लाँच केलेल्या नवीन हँडसेटमध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 7,200mAh बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, डुअल-बँड वाई-फाई, ब्लूटूथ 4.2, यूएस बी टाईप सी पोर्ट, जीपीएस, बेईडू, ग्लोनास, गॅलिलिओ आणि QZSS चा सपोर्ट देण्यात आला आहे. ऑनबोर्ड सेंसर्सच्या यादीमध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, ई-कंपास, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि जायरोस्कोप यांचा समावेश आहे.