Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु

WhatsApp लवकरच एक नवीन फीचर रोलआऊट करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील वाढत्या स्कॅमच्या घटना लक्षात घेऊन कंपनीने या नवीन फीचरवर काम सुरु केले आहे. या फीचरमध्ये यूजर्सना आलेल्या संशयास्पद मेसेजबाबत अलर्ट पाठवला जाणार आहे. आगामी फीचर कसं काम करणार जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2026 | 10:48 AM
WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक... नव्या फीचरची चाचणी सुरु

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक... नव्या फीचरची चाचणी सुरु

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅप लवकरच स्कॅम अलर्ट फीचर आणणार असून संशयास्पद मेसेज आल्यास यूजर्सना त्वरित इशारा दिला जाईल.
  • हे फीचर पूर्णपणे ऑन-डिव्हाइस काम करणार असल्याने यूजर्सच्या प्रायव्हसीला कोणताही धोका निर्माण होणार नाही.
  • अनोळखी नंबर आपोआप ब्लॉक न करता अंतिम निर्णय घेण्याचा पर्याय यूजरलाच दिला जाणार आहे.
WhatsApp Upcoming Feature: मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर यूजर्सच्या प्रायव्हसीला धक्का न लावता स्कॅमर्सना पकडणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन सुरक्षा फीचर संशयास्पद मेसेज ओखळणं आणि स्कॅमपासून यूजर्सचा बचाव करण्यासाठी मदत करणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हे आगामी फीचर अनोळखी नंबरवरून येणारे संशयास्पद मेसेज ओळखणार आहे आणि चॅटमध्ये यूजर्सना या मेसेजबाबत अलर्ट करणार आहे. नव्या फीचरअंतर्गत मेसेजिंग ॲप संशयास्पद मेसेज हाताळताना यूजर्सना सुरक्षेचा आणखी एक स्तर प्रदान करू शकते.

Free Fire Max: गन स्किन मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी! EVO Vault ईव्हेंटमध्ये सहभागी व्हा आणि असे क्लेम करा रिवॉर्ड्स

यूजर्सच्या प्रायव्हसीला धक्का लागणार नाही

WABetaInfo ने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप सर्वकाही फोनवर मॅनेज करणार आहे, ज्यामुळे यूजर्सच्या प्रायव्हसीला धक्का लागणार नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, आगामी फीचर फार रंजक असणार आहे. कंपनी सध्या या फीचरची चाचणी करत असून अद्याप हे फीचर बीटा यूजर्ससाठी देखील रोलआऊट करण्यात आले नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

नवीन स्कॅम अलर्ट फीचर

व्हॉट्सअ‍ॅपवर गेल्या काही काळापासून ऑनलाईन स्कॅम आणि फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. स्कॅमर्स लोकांना अनोळखी नंबरवरून मेसेज पाठवतात. अनेकदा स्कॅमर्स भासवतात की ते पोलीस किंवा सरकारी अधिकारी आहेत, ज्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसतो. तर काही घटनांमध्ये स्कॅमर्स लोकांच्या खोट्या लिंक पाठवतात, ज्यावर क्लिक करताच यूजर्सचं संपूर्ण बँक अकाऊंट रिकामं होतं. याच सर्वांचा विचार करून आणि यूजर्सच्या सुरक्षेचा विचार करून आता व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या फीचरवर काम करत आहे. कंपनीचे हे नवीन फीचर स्कॅम अलर्ट नावाने जारी केले जाऊ शकते. या फीचरअंतर्गत जर कोणताही संशयास्पद मेसेज आला तर यूजरला त्वरित अलर्ट केले जाणार आहे.

नवीन फीचर अनोळखी आणि संशयास्पद नंबर आपोआप ब्लॉक करण्याऐवजी यूजरला माहिती देणार आहे. ज्यामुळे यूजर्स स्वत: निर्णय घेऊ शकणार आहेत. यूजर्स ठरवू शकणार आहेत की, त्यांना संशयास्पद नंबर विरोधात कोणती कारवाई करायची आहे की, संभाषण पुढे सुरु ठेवायचं आहे.

कसं काम करणार नवं फीचर?

फोनमध्ये जेव्हा तुम्ही स्कॅम अलर्ट फीचर इनेबल कराल, तेव्हा अ‍ॅप अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज थेट डिव्हाईसवर रिव्ह्यु करणार आहे. तर सिस्टिमला असे संकेत मिळाले की, कोणता मेसेज फ्रॉड आहे तर चॅट्समध्ये एक वॉर्निंग बॅनर दिसेल. या अलर्ट बॅनरमध्ये ‘This may be a scam’ (हा स्कॅम असू शकतो) असा मेसेज दिसण्याची शक्यता आहे. यानंतर यूजरकडे पर्याय असेल की तो संबंधित नंबर ब्लॉक आणि रिपोर्ट करू शकतो किंवा त्यावर विश्वास ठेऊन संभाषण सुरु ठेऊ शकतो.

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

व्हॉट्सअ‍ॅपचं असं म्हणणं आहे की, हे फीचर पूर्णपणे ऑन डिव्हाईस काम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. ज्यामुळे विश्लेषणासाठी व्हॉट्सॲप किंवा मेटावर मेसेज पाठवण्याची गरज भासणार नाही. तसेच कंपनी लोकल ट्रांसपेरेंसी रिपोर्ट्सवर देखील काम करत आहे. हे फीचर्स लवकरच यूजर्सना अनुभवता येणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हॉट्सॲपवर कोणाची मालकी आहे?

    Ans: Meta Platforms या कंपनीच्या मालकीचे व्हॉट्सॲप आहे.

  • Que: व्हॉट्सॲप वापरण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे का?

    Ans: होय, व्हॉट्सॲप वापरण्यासाठी मोबाईल डेटा किंवा Wi-Fi इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते.

  • Que: व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल करता येतो का?

    Ans: होय, व्हॉट्सॲप द्वारे वैयक्तिक तसेच ग्रुप व्हिडिओ कॉल करता येतात.

Web Title: Whatsapp is planning to roll out new scam alert feature know how it works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Free Fire Max: गन स्किन मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी! EVO Vault ईव्हेंटमध्ये सहभागी व्हा आणि असे क्लेम करा रिवॉर्ड्स
1

Free Fire Max: गन स्किन मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी! EVO Vault ईव्हेंटमध्ये सहभागी व्हा आणि असे क्लेम करा रिवॉर्ड्स

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स
2

नेटवर्क गेलं तरी कॉल थांबणार नाही! BSNL यूजर्स आत्ताच ऑन करा फोनमधील ही सेटिंग… फॉलो करा या स्टेप्स

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत
3

स्मार्टफोन ग्राहकांना मोठा झटका! Poco चे तीन स्वस्त 5G डिव्हाईस झाले महाग! तब्बल इतकी वाढली किंमत

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स
4

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.