Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित

WhatsApp: व्हॉट्सॲपने त्यांच्या यूजर्ससाठी काही नवीन फीचर्स जारी केले आहेत. यामध्ये एकापेक्षा जास्त पासकी, पिनऐवजी पासवर्ड आणि अनोळखी कॉल्सची माहिती यांचा समावेश आहे. या फीचरबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2026 | 11:31 AM
WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित

WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित

Follow Us
Follow Us:
  • एकापेक्षा जास्त पासकी : अँड्रॉईड आणि आयफोन दोन्ही वापरणाऱ्या यूजर्सना आता त्यांच्या व्हॉट्सॲप अकाऊंटसाठी एकापेक्षा जास्त पासकी तयार करता येणार आहेत.
  • पिनऐवजी पासवर्ड: टू- स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये आता 6 अंकी पिनऐवजी अक्षरे, नंबर आणि विशेष चिन्हांचा वापर करून मजबूत पासवर्ड तयार करता येणार आहे.
  • अनोळखी कॉल्सची माहिती: अँड्रॉईड यूजर्सना अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलचा देश आणि कॉमन व्हॉट्सॲप ग्रुपची माहिती मिळू शकणार आहे.
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप वापरणाऱ्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने त्यांचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित व्हावे यासाठी काही नवीन फीचर्स जारी केले आहेत. कंपनी आता त्यांच्या यूजर्सना साइन-इन आणि अकाऊंट प्रोटेक्शनवर जास्त कंट्रोल ऑफर करणार आहे. या नवीन अपडेटनंतर आता यूजर्स एकापेक्षा जास्त पासकीचा वापर करू शकणार आहेत. यासोबतच टू-स्टेप व्हेरिफिकेशन देखील अधिक मजबूत करण्यात आले आहे. तसेच, अँड्रॉईड यूजर्सना अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सबाबत आधीच जास्त माहिती मिळणार आहे. या तिन्ही फीचरबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!

एकापेक्षा जास्त पासकी पर्याय

व्हॉट्सॲपने आता पासकी फीचर अधिक चांगले बनवले आहे. पासकी फीचरच्या मदतीने यूजर्स एसएमएस व्हेरिफिकेशन कोड एंटर करण्याऐवजी फिंगरप्रिंट, फेस आयडी किंवा स्क्रीन लॉकचा वापर करून त्यांच्या अकाऊंटमध्ये पुन्हा लॉगिन करू शकतात. कंपनीचं असं म्हणणं आहे की, जगभरात एक अब्जहून अधिक लोकांनी त्यांच्या व्हॉट्सॲप अकाऊंटसाठी पासकी क्रिएट केली आहे. जर एखादा यूजर अँड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्ही डिव्हाईसचा वापर करत असेल तर तो यूजर त्याच्या अकाऊंटसाठी एकापेक्षा जास्त पासकी क्रिएट करू शकतो. पासकी क्रिएट करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये जाऊन अकाऊंटवर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर पासकी पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्ही पासकी क्रिएट करू शकता.

WhatsApp is rolling out the account password feature! WhatsApp is introducing a feature that replaces the two-step verification PIN with an account password.https://t.co/5JVuqpihnV pic.twitter.com/IOavOyyg7X — WABetaInfo (@WABetaInfo) August 25, 2026

पिनऐवजी तयार करू शकता पासवर्ड

व्हॉट्सॲपने त्यांचे टू- स्टेप व्हेरिफिकेशन देखील पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवले आहे. आतापर्यंत यूजर्सना जास्तीच्या सुरक्षेसाठी 6 डिजीट पिन सेट करण्याचा पर्याय ऑफर केला जात होता. मात्र आता नव्या अपडेटमुळे यामध्ये देखील बदल करण्यात आला आहे. आता यूजर्स पिनऐवजी पासवर्ड क्रिएट करू शकणार आहेत. यामध्ये अक्षरं, नंबर आणि विशेष कॅरेक्टर्सचा देखील समाविष्ट केले जाऊ शकतात. मोठा आणि जास्त कॉम्प्लेक्स पासवर्ड असल्यामुळे दुसरा व्यक्ती हा पासवर्ड अगदी सहज ओळखू शकणार नाहीत.

बँकेचा SMS की सायबर गुन्हेगारांचा नवा डाव? बनावट मेसेज ओळखण्याची ही आहे सोपी ट्रिक, एका मिनिटात समजेल सत्य

अनोळखी कॉल्सची माहिती मिळणार

व्हॉट्सॲप आता अँड्रॉईड यूजर्सना अनोळखी कॉल्सची माहिती देणार आहे. जर यूजरला अशा एखाद्या नंबरवरून कॉल येत आहे, जो त्याच्या संपर्क यादीत समाविष्ट नाही, तर अशावेळी व्हॉट्सॲप यूजरला संबंधित कॉलबाबत जास्तीची माहिती दाखवली जाणार आहे. यामध्ये समजू शकते की, कॉल करणारी व्यक्ती दुसऱ्या देशाची आहे की नाही आणि हा व्यक्ती यूजरसोबत कोणत्या ग्रुपमध्ये जोडला आहे की नाही. यामुळे यूजर अंदाज लावू शकतात की ही व्यक्ती कोण असू शकते आणि ठरवू शकतात की कॉल रिसिव्ह करायचा आहे की नाही.

Web Title: Whatsapp released new features for users including multiple passkeys and stronger password security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?
1

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये
2

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
3

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा

WhatsApp: वाढदिवसाच्या शुभेच्छा असोत किंवा महत्त्वाचे डिटेल्स…  वेळेवर सेंड होणार प्रत्येक मेसेज, व्हॉट्सॲपचं नवं फीचर चर्चेत
4

WhatsApp: वाढदिवसाच्या शुभेच्छा असोत किंवा महत्त्वाचे डिटेल्स… वेळेवर सेंड होणार प्रत्येक मेसेज, व्हॉट्सॲपचं नवं फीचर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.