Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी होणार आणखी मजबूत! कंपनी घेऊन आली नवं फीचर, AI चॅट्स आता पूर्णपणे सुरक्षित

WhatsApp incognito Chat Features: व्हॉट्सअ‍ॅपने यूजर्सची प्रायव्हसी आणखी मजबूत करण्यासाठी एक नवीन फीचर रोलआऊट केले आहे. या फीचरमुळे आता AI सोबतचे संभाषण अधिक सुरक्षित आणि खाजगी राहणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 15, 2026 | 01:06 PM
WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी होणार आणखी मजबूत! कंपनी घेऊन आली नवं फीचर, AI चॅट्स आता पूर्णपणे सुरक्षित

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी होणार आणखी मजबूत! कंपनी घेऊन आली नवं फीचर, AI चॅट्स आता पूर्णपणे सुरक्षित

Follow Us
Follow Us:
  • WhatsApp ने ‘Incognito Chat with Meta AI’ हे नवीन प्रायव्हसी फीचर रोलआऊट केले.
  • मेटा AI सोबतचे संभाषण ट्रस्टेड एक्जीक्युशन एनवायरमेंट अंतर्गत सुरक्षित राहणार आहे.
  • कंपनीच्या दाव्यानुसार AI चॅट्स मेटा देखील अ‍ॅक्सेस करू शकणार नाही.
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या करोडो यूजर्ससाठी एक नवीन प्रायव्हसी फीचर रोलआऊट केलं आहे. कंपनीने रोलआऊट केलेल्या या नव्या फीचरचं नाव इनकॉग्निटो चॅट विथ मेटा एआय असं आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स मेटा AI सोबत सीक्रेट चॅट्स करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हे चॅट्स पूर्णपणे सुरक्षित राहणार आहेत. तज्ज्ञांनी केलेल्या अनेक दाव्यानंतर कंपनीने अखेर हे नवीन फीचर रोलआऊट केलं आहे.

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये

AI सोबत केले जाणारे चॅट्स राहणार सुरक्षित

यापूर्वी अनेक तज्ज्ञांनी असे दावे केले होते की, AI सोबत केली जाणारी चॅटिंग कंपनी वाचू शकते. यामुळेच आता कंपनी नव्या फीचरसह AI सोबत केले जाणारे चॅट्स सुरक्षित ठेवणार आहे. मेटाने सादर केलेले नवीन फीचर प्रायव्हेट प्रोसेसिंग टेक्नोलॉजीवर आधारित आहे. कंपनीने सांगितलं आहे की, इनकॉग्निटो चॅटमध्ये सर्व AI प्रोसेसिंग एक ट्रस्टेड एक्जीक्युशन एनवायरमेंट (TEE) अंतर्गत केले जाते. याचा उद्देश असा आहे की, सीक्रेट चॅटिंग कोणीही अ‍ॅक्सेस करू नये, मेटा स्वत: देखील नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

इनकॉग्निटो चॅट विथ मेटा एआय फीचर

वेब ब्राऊझरमध्ये यूजर्सची प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी इनकॉग्निटो टॅब्स दिले जातात. त्याचप्रमाणे मेटाने देखील त्यांच्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी नवीन चॅट फीचर रोल आउट केले आहे. कंपनीने सांगितलं आहे की, जे यूजर्स AI सोबत त्यांच्या जीवनातील वैयक्तिक गोष्टी शेअर करतात, त्यांच्यासाठी हे फीचर अतिशय फायद्याचं ठरणार आहे. मेटाने दावा केला आहे की, जारी करण्यात आलेल्या नव्या फीचरनंतर आता मेटा AI चॅटबोटसोबत व्हॉट्सअ‍ॅपवर केले जाणारे संभाषणा कोणीही अ‍ॅक्सेस करू शकत नाही. इतकंच नाही तर मेटा स्वत: देखील हे चॅट्स अ‍ॅक्सेस करू शकणार नाही.

कसं काम करत नवं फीचर?

मेटाच्या ब्लॉगपोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर कंपनीच्या प्रायव्हेट प्रोसेसिंग टेक्नोलॉजीवर आधारित आहे. या फीचरअंतर्गत मेटा AI सोबत तुम्ही अशा पद्धतीने संभाषण करू शकता की, इतर कोणीही तुमचे चॅट्स अ‍ॅक्सेस करू शकणार नाही. तसेच मेटा AI सोबत केले जाणारे संभाषण सेव्ह देखील होणार नाही. यूजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव… धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर

मेटा AI सोबतचे यूजर्सचे संभाषण पूर्णपणे खाजगी राहावे यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. कारण काही यूजर्स मेटा AI सोबत त्यांच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करतात. जर ही माहिती कोणाच्याही हाती लागली तर यूजरचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. याच गोष्टींचा विचार करूव कंपनीने नवीन फीचर रोलआऊट केलं आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: WhatsApp कोणाच्या मालकीचे आहे?

    Ans: WhatsApp हे Meta कंपनीच्या मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.

  • Que: WhatsApp वर AI फीचर्स उपलब्ध आहेत का?

    Ans: हो, WhatsApp मध्ये Meta AI आधारित अनेक फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहेत.

  • Que: WhatsApp चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात का?

    Ans: हो, WhatsApp वरचे वैयक्तिक चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित असतात.

Web Title: Whatsapp rolls out new privacy feature for meta ai chats users will get extra security tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Email Undo Trick: चुकीने ईमेल पाठवला? ‘या’ ट्रिकने तुरंत करा Unsend, समोरचा व्यक्ती वाचूही शकणार नाही तुमचा मेसेज!
1

Email Undo Trick: चुकीने ईमेल पाठवला? ‘या’ ट्रिकने तुरंत करा Unsend, समोरचा व्यक्ती वाचूही शकणार नाही तुमचा मेसेज!

सरकारचा मोठा इशारा! व्हॉट्सॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे ‘Boss Scam’; तुमची एक चूक अन् होईल मोठं नुकसान
2

सरकारचा मोठा इशारा! व्हॉट्सॲप आणि ई-मेलवरून सुरू आहे ‘Boss Scam’; तुमची एक चूक अन् होईल मोठं नुकसान

Vi यूजर्सची लागली लॉटरी! 3 महिन्यांचे Spotify Premium मिळणार मोफत… कसं? जाणून घ्या सविस्तर
3

Vi यूजर्सची लागली लॉटरी! 3 महिन्यांचे Spotify Premium मिळणार मोफत… कसं? जाणून घ्या सविस्तर

स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये एंट्री करणार Apple? ‘iRing’ च्या लीक्समुळे सुरु झाल्या नवीन चर्चा… वाचा सविस्तर
4

स्मार्ट रिंग सेगमेंटमध्ये एंट्री करणार Apple? ‘iRing’ च्या लीक्समुळे सुरु झाल्या नवीन चर्चा… वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.