
Tech News: कधी आणि कसा स्वच्छ करावा Solar Panel? 90 टक्के लोकांना माहिती नाही महत्त्वाचे नियम... वाचा सविस्तर
सोलर पॅनलची साफसफाई कधी करावी या प्रश्नाचे कोणतेही अचूक उत्तर नाही. कारण या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. सोलार पॅनलची साफसफाई करून काही महिने उलटले असतील आणि पॅनलवर धूळ, माती आणि कचरा इत्यादी जमा झाला असेल तर तुम्ही सोलार पॅनलची साफसफाई करू शकता. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की सोलर पॅनलची कार्यक्षमता कमी झाली आहे आणि ते योग्य प्रकारे काम करत नाही, तर तुम्ही याची साफसफाई करण्याचा विचार करू शकतो. सोलार पॅनलची योग्य स्वच्छता केल्यानंतर देखील सोलार पॅनलची कार्यक्षमता पूर्वी सारखी वाटत नसेल तर यामागे तांत्रिक समस्या देखील असू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोलर पॅनलची स्वच्छता करण्यासाठी सकाळचा वेळ किंवा एखाद्या थंड दिवसाची निवड करा. उष्णता शोषण्याच्या गुणधर्मामुळे, सूर्योदयानंतर पॅनल खूप जास्त गरम होतात आणि अशावेळी त्यांची स्वच्छता करणे एखाद्या धोक्यापेक्षा कमी नाही. जर सोलार पॅनल जास्त उंचीवर असेल तर त्याची स्वच्छता करण्यासाठी एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीची मदत घ्या.
Ans: सोलार पॅनल हे सूर्यप्रकाशातील ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करणारे उपकरण आहे.
Ans: सोलार पॅनलमधील फोटोव्होल्टेइक (PV) सेल्स सूर्यप्रकाश शोषून वीज निर्माण करतात.
Ans: वीज बिलात बचत, पर्यावरणपूरक ऊर्जा आणि दीर्घकालीन खर्चात कपात हे त्याचे प्रमुख फायदे आहेत.