(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
देवेंद्र सिंह चपलोत हे फक्त एआय (AI) संशोधक नसून ते एक रोबोटिक्स एक्सपर्ट देखील आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बे येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी (CMU) मधून त्यांनी मशीन लर्निंगमध्ये पीएचडी केली आहे. देवेंद्र यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांनी प्रसिद्ध एआय स्टार्टअप ‘Mistral AI’ च्या फाउंडिंग टीममध्ये काम केले आहे. याशिवाय, त्यांनी ‘फेसबुक एआय रिसर्च’ (FAIR) लॅबमध्ये रिसर्च सायंटिस्ट म्हणून मशीन लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन आणि रोबोटिक्स यांसारख्या अवघत क्षेत्रांत महत्त्वाचं योगदान दिलं आहे.
देवेंद्र यांच्या स्कील मस्क यांच्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये त्यांच्या तुऱ्यात CVPR-2019 PointNav, CVPR-2020 ObjectNav आणि ‘विजुअल-डूम एआय’ सारख्या स्पर्धांचा समावेश आहे. त्यांना प्रतिष्ठित ‘फेसबुक फेलोशिप अवॉर्ड’ देखील मिळाला आहे. त्यांच्या संशोधनाची दखल MIT टेक्नॉलॉजी रिव्ह्यू, टेकक्रंच आणि डेली मेलसारख्या जागतिक दर्जाच्या मीडिया प्लॅटफॉर्मने देखील घेतली आहे.
देवेंद्र यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट करत या निवडीची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “मी SpaceX आणि xAI मध्ये सामील होत आहे. एलन मस्क आणि त्यांच्या टीमसोबत ‘सुपरइंटेलिजन्स’ विकसित करण्यासाठी काम करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.” मस्क यांनीही त्यांचे स्वागत केले आहे.
I’m joining SpaceX and xAI, working closely with Elon and team to build superintelligence. Together SpaceX and xAI combine physical and digital intelligence under a leader who understands hardware at the deepest level. Add a high-agency culture with frontier-scale resources, and… pic.twitter.com/tjaPUjGUwK — Devendra Chaplot (@dchaplot) March 13, 2026
सुपरइंटेलिजन्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असे प्रगत रूप, जे तर्कशक्ती, सर्जनशीलता आणि समस्या निवारण यांसारख्या मानवी बुद्धिमत्तेच्या सर्व निकषांवर मानवाला मागे टाकू शकतं. हे केवळ माहिती देणारे यंत्र नसून, ते स्वतःहून शिकू शकतं आणि अधिक स्मार्ट बनू शकतं. हे तंत्रज्ञान भविष्यात विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतं. एलन मस्क यांचा हा प्रयत्न तंत्रज्ञानाच्या जगात एक नवा इतिहास घडवू शकतो.






