Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर कीबोर्डचे रहस्य उलघडलेच! ABCDE ऐवजी QWERTY क्रम का? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित

आपण आपल्या रोजच्या जीवनात मोबाईल किंवा लॅपटॉप वापराताना सतत किबोर्डचा वापर करतो. तुमच्या नजरेसमोर सतत किबोर्डवरील अक्षरं असतात. पण तुम्हाला या अक्षरांचा रंजक इतिहास माहिती आहे का? किबोर्डवरील अक्षरं QWERTY क्रमाने का दिलेली असतात, यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 11, 2026 | 07:46 PM
अखेर कीबोर्डचे रहस्य उलघडलेच! ABCDE ऐवजी QWERTY क्रम का? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित

अखेर कीबोर्डचे रहस्य उलघडलेच! ABCDE ऐवजी QWERTY क्रम का? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित

Follow Us
Follow Us:
  • कीबोर्डवर ABCDE ऐवजी QWERTY लेआउट टाइपराइटर जाम होऊ नये म्हणून तयार करण्यात आले.
  • आधुनिक कीबोर्डमध्येही QWERTY लेआउट सवय आणि वापरकर्त्यांच्या सोयीमुळे कायम आहे.
  • QWERTY लेआउट दीर्घकाळ टायपिंगसाठी अधिक सोयीचे मानले जाते.
मोबाईल, कंप्युटर आणि लॅपटॉप आज आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. मोबाईल, कंप्युटर आणि लॅपटॉपवर आपण सतत किबोर्डचा वापर करत असतो. किबोर्डचा वापर करताना मनात येणारा सर्वात सामान्य प्रश्न म्हणजेच कीबोर्डवर अक्षरं ABCDE या सरळ ओळीत का नाही दिली? शाळेत तर आपल्याला ABCDE च्या क्रमानेच मुळाक्षरं शिकवण्यात आली होती. मग किबोर्डवरील अक्षरं याच क्रमाने का नाहीत? यामागील कारण फार मजेदार आहे आणि याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही होणार स्वस्त? सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार दिलासा, जाणून घ्या सविस्तर

टाइपराइटरने सुरु झाली कथा

किबोर्डचा संबंध 150 वर्षे जुन्या टाइपराइटरशी आहे. सुरुवातीला टाइपराइटरमध्ये ABCDE या क्रमाने असतील, तर शेजारील बटणे दाबल्याने धातूच्या सळ्या एकमेकांवर आदळत असत. यामुळे अनेकदा मशीन जाम होऊन त्याचा वेग मंदावत असे. (फोटो सौजन्य: Pinterest)

QWERTY लेआउट तयार करण्याचे कारण काय?

मशीन जाम होऊ नये आणि त्याचा वेग मंद होऊ नये, यासाठी इंजिनिअर्सनी अक्षरांना असे सेट केले ज्यामुळे जास्त वापर होणारी बटन एकमेकांपासून दूर राहतील. यानंतर सुरु झाले किबोर्डचे QWERTY लेआउट. हेच लेआऊट आज देखील प्रत्येक किबोर्डमध्ये वापरले जाते. QWERTY लेआउट किबोर्डचा उद्देश टाईपिंगचा वेग वाढवणं नाही तर टाइपराइटर जाम होण्याची समस्या सोडवणं असा आहे.

आजही का केला जातोय QWERTY लेआउटचा वापर?

आज तंत्रज्ञान प्रचंड बदलले आहे. प्रत्येक क्षेत्रात ॲडव्हांस तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये किबोर्डचा देखील समावेश आहे. म्हणजेच सध्याच्या काळात वापरल्या जाणाऱ्या किबोर्डमध्ये ना धातूच्या सळ्या आहेत आणि ना तो सतत अडकण्याची भीती आहे. मग तरी देखील जुन्या लेआऊटचा वापर का केला जात आहे? यामागील कारण म्हणजे सवय आणि ट्रेनिंग. करोडो लोकं QWERTY लेआउटवर टाईप करण शिकले आहेत. अशा परिस्थितीत जर आता अचानक ABCDE क्रम असणारा किबोर्ड वापरात आला, तर लोकांचा गोंधळ उडू शकतो आणि लोकं टाईप करू शकत नाहीत.

WhatsApp Update: मित्राचा वाढदिवस लक्षात ठेवण्याची चिंता मिटली! मेसेजिंग प्लॅटफॉर्म घेऊन येतंय बर्थडे रिमाइंडर फीचर, असं करणार काम

ABCDE लेआउट जास्त सोपे असेल का?

ABCDE क्रम असणारा किबोर्डचा वापर ऐकयला सोपा वाटत असला तरी यामध्ये लोकांचा फार गोंधळ उडू शकतो. तसेच यामध्ये बोटांच्या हालचाली जास्त थकू शकता. QWERTY लेआउटमध्ये बोटांच्या नैसर्गिक स्थितीचा विचार केला जातो, ज्यामुळे दीर्घकाळ टायपिंग करणे सोपे होते. किबोर्डचे डिझाईन सुविधेपेक्षा जास्त इतिहास आणि सवयीवर अवलंबून आहे. तंत्रज्ञान बदलले असले तरी देखील मानवी सवयी इतक्या सहज बदलत नाहीत. म्हणूनच ABCDE वर्णमालेच्या सरळ रेषा आजही फक्त पुस्तकांमध्ये दिसतात, कीबोर्डवर नाही.

Web Title: Why letters on keyboard are arranged in qwerty order and not in abcd order know the interesting reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या
1

Apple ला मिळणार नवा चेहरा! टीम कुक CEO पदावरून होणार पायउतार; कोण स्वीकारणार कंपनीची धुरा? जाणून घ्या

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स
2

मार्केट गाजवण्यासाठी Boltt सज्ज! भारतीय बाजारात लाँच केला पहिला स्मार्टफोन, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार पावरफुल फीचर्स

WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित
3

WhatsApp Update: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी नवं फीचर जारी! अनोळखी कॉल्सची मिळणार माहिती, अकाऊंट होणार आणखी सुरक्षित

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!
4

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला चॉकलेट्स नाही… लाडक्या बहिणीला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, पाहताच होईल खुश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.