Sim card (Photo Card: X)
आपल्या आयुष्यात आपण खुप गोष्टी वापरतो पण त्यामागे त्यांच्या डिझाइनमागे किंवा कार्य करण्यामागे काही विशिष्ट कारण असते. मात्र, त्याबद्दल आपल्याला माहिती नसते. उदाहरणार्थ, आपण सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये सिम कार्ड वापरतो, पण तुम्हाला माहीत आहे का, त्याचा एक कोपरा कापलेला का असतो? हा कधी विचार आला आहे का डोक्यात? लहानपणांपासूमन तुम्ही सिम कार्डला पाहत असाला पण त्याचे डिझायन असे का असा विचार आला आहे का? 99 टक्के लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल. जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल, तर चला त्यामागचे सोपे आणि महत्त्वाचे कारण जाणून घेऊया.
सिम कार्डचे स्टँडर्ड डायमेन्शन्स 25 मिमी रुंदी, 15 मिमी लांबी आणि 0.76 मिमी जाडीचे असतात. योग्य ठिकाणी बसवण्यासाठीच त्याचा एक कोपरा कापला जातो. यामुळे सिम स्लॉटमध्ये ते फक्त एकाच दिशेने बसते, ज्यामुळे सिम कार्ड खराब होण्याचा धोका टळतो.
सिम कार्ड हे एक प्रकारचे ‘स्मार्ट कार्ड’ आहे. त्याचा आधार सिलिकॉन इंटिग्रेटेड सर्किट (IC) चिप आहे. प्लास्टिक कार्डवर सिलिकॉन आयसी चिप्स बसवण्याची कल्पना 1960 च्या दशकात पुढे आली. तेव्हापासून, स्मार्ट कार्डमध्ये एमओएस (MOS) इंटिग्रेटेड सर्किट चिप्स तसेच फ्लॅश मेमरी आणि ईईपीआरओएम सारख्या एमओएस मेमरी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
सिम कार्डचे पूर्ण नाव सब्सक्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल असे आहे. याचे मुख्य कार्य मोबाईल फोनला सेल्युलर नेटवर्कशी जोडणे हे असते. सिम कार्डमध्ये इंटरनॅशनल मोबाईल सब्सक्राइबर आयडेंटिटी (IMSI) नंबर आणि त्याच्याशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती साठवलेली असते. जेव्हा मोबाईल सुरू होतो, तेव्हा तो सिम कार्डमधील डेटा वाचून नेटवर्ककडे पाठवतो. यानंतर नेटवर्क संबंधित यूजरची ओळख पडताळतो आणि त्याला नेटवर्क वापरण्याची परवानगी देतो. याच कारणामुळे एका कंपनीचे सिम कार्ड दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कशी थेट जोडले जात नाही.