Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित

सोशल मीडिया X वापरणाऱ्या यूजर्सना पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केले आहे. अधिकृत सिक्युरिटी ईमेलसारखे दिसणारे बनावट ईमेल पाठवून लॉगिन माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात असून, यूजर्सनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2026 | 01:18 PM
सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित

Follow Us
Follow Us:
  • X यूजर्सना फेक सिक्युरिटी ईमेल पाठवून लॉगिन डिटेल्स चोरण्याचा नवा फिशिंग स्कॅम सुरू झाला आहे.
  • बनावट लॉगिन अलर्ट आणि X ब्रँडिंगचा वापर करून सायबर गुन्हेगार यूजर्सना जाळ्यात ओढत आहेत.
  • संशयास्पद ईमेलवरील लिंकवर क्लिक टाळा आणि ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर तक्रार करा.
सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या यूजर्सना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सायबर गुन्हेगार अकाऊंट क्रेडेंशियल्स चोरण्याच्या उद्देशाने एका नवीन फिशिंग कँपेनद्वारे एक्स यूजर्सना टार्गेट करत आहेत. या स्कॅममध्ये यूजर्सना अधिकृत ईमेलसारखेच दिसणारे खोटे सिक्योरिटी अलर्ट्स पाठवले जात आहे, ज्यामुळे खऱ्या आणि खोट्या ईमेल्समधील फरक ओळखणं फार कठीण झालं आहे. सिक्योरिटी एक्सपर्ट्सने इशारा दिला आहे की, या खोट्या ईमेल्सचा उद्देश लोकांमध्ये भिती निर्माण करणं आणि यूजर्सना त्यांचे लॉगिन डिटेल्स शेअर करणयासाठी प्रवृत्त करणे हा आहे.

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

यूजर्सवर अकाऊंट सुरक्षित ठेवण्याचा दबाव

समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, यूजर्सना असे ईमेल्स मिळत असल्याचा दावा केला जात आहे, ज्यामध्ये सांगितलं आहे की, अनोळखी लोकेशन किंवा डिव्हाईसवरून त्यांच्या एक्स अकाऊंटमध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेसेजमध्ये यूजर्सना व्हेरिफाय करण्यास सांगितलं जात आहे की, त्यांनी दुसऱ्या डिव्हाईसवरून किंवा लोकेशनवरून लॉगिन करण्याचा प्रयत्न केला आहे का, जर असं नसेल तर यूजर्सवर अकाऊंट सुरक्षित ठेवण्याचा दबाव निर्माण केला जात आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

ईमेल्समध्ये एक्सची ब्रँडिंग देखील समाविष्ट

सायबर गुन्हेगारांद्वारे पाठवलेले हे ईमेल्स बऱ्याच प्रमाणात खऱ्यासारखे दिसतात आणि विशेष म्हणजेच यामध्ये एक्सची ब्रँडिंग देखील समाविष्ट असते. याचा उद्देश ईमेल रिसीव्ह करणाऱ्या यूजरला दुर्भावनापूर्ण लिंक्सवर क्लिक करण्यास किंवा अटॅचमेंट्स उघडण्यासाठी जाळ्यात ओढणं असा आहे, ज्यामुळे हॅकर्स क्रेडेंशियल्स चोरी करू शकतात. सायबरसुरक्षा तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, एक्स कधीही ईमेल्स किंवा डायरेक्ट मेसेजद्वारे पासवर्ड शेअर करण्यास सांगत नाही आणि कधीही यूजर्सना सिक्योरिटी संबंधित कोणत्याही अटॅचमेंट फाईल्स पाठवल्या जात नाहीत.

हाय प्रोफाईल अकाऊंट्सवर हॅकर्सची नजर

नवीन कँपेन मागील फिशिंग अटॅक्ससारख्या पॅटर्न फॉलो करतात. यापूर्वी झालेल्या अशाच स्कॅम्समध्ये संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी यूजर्सवर कॉपीराइट उल्लंघनाचे किंवा खात्यातील संशयास्पद हालचालींचे खोटे आरोप करण्यात आले होते. विशेषत: हॅकर्स हाय प्रोफाईल अकाऊंट्सवर निशाणा साधतात, कारण एखादे अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्याचा वापर क्रिप्टो स्कॅम किंवा दुसऱ्या फ्रॉड प्रमोशन्ससाठी केला जाऊ शकतो.

सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

तज्ज्ञांनी यूजर्सना सल्ला दिला आहे की, कोणत्याही सिक्योरिटी-रिलेटेड मेसेजवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी सेंडरचा ईमेल एड्रेस तपासा. जर एखाद्या ईमेलमुळे तातडीची भावना निर्माण होत असेल किंवा त्यात वैयक्तिक माहिती मागितली जात असेल, तर तुम्ही सावध राहिले पाहिजे.

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य

तज्ज्ञांचे असे मत आहे की, अनोळखी ईमेल्सद्वारे मिळालेल्या लिंक्स आणि अटॅचमेंट्सवर क्लिक करू नका. केवळ अधिकृत स्टोअर्सद्वारे ॲप डाऊनलोड करा. ईमेल किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सद्वारे पासवर्ड किंवा बँकिंग डिटेल्स शेअर करू नका. यूजर्सना त्यांचे स्मार्टफोन आणि संगणक अपडेटेड सुरक्षा पॅचेससह अपडेट ठेवण्याचा आणि विश्वसनीय अँटीव्हायरस वापरण्याचा सल्लाही दिला जातो. भारतात, जर कोणी ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले, तर त्यांनी या घटनेची तक्रार करण्यासाठी त्वरित ‘नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन’च्या 1930 या क्रमांकावर कॉल करावा.

Web Title: X users warned new phishing scam uses fake security emails to steal login credentials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट
1

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई
2

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
3

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
4

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.