फोटो सौजन्य -iStock
तुम्ही Xiaomi युजर असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. Xiaomi ने त्यांचे काही स्मार्टफोन End Of Life लिस्टमध्ये समाविष्ट केले आहेत. जे फोन End Of Life लिस्टमध्ये समाविष्ट केले जातात त्या फोनसाठी कंपनी कोणतेही नवीन अपडेट, फीचर किंवा आवश्यक सुरक्षा पॅच घेऊन येत नाही. त्यामुळे आता कंपनीने End Of Life लिस्टमध्ये जे फोन समाविष्ट केले आहेत त्या फोनसाठी कंपनी कोणतेही नवीन अपडेट, फीचर किंवा आवश्यक सुरक्षा पॅच लाँच करणार नाही. End Of Life लिस्टमध्ये समाविष्ट झालेल्या फोनमध्ये MI 10 सिरीज आणि Redmi 10 लाइनअपचे अनेक लोकप्रिय फोन आहे. या यादीमध्ये काही Poco फोनचा देखील समावेश आहे.
हेदेखील वाचा- WhatsApp युजर्ससाठी खुशखबर! Instagram चं भन्नाट फीचर आता WhatsApp वर येतंय
हेदेखील वाचा- तुमचं टेलिग्राम अकाऊंट हॅक झालं आहे का? तर लगेच करा फॉलो करा ‘या’ स्टेप्स
वर दिलेल्या फोन्सपैकी कोणताही फोन तुमच्याकडे असेल तर आता तुमचा फोन अपग्रेड करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक कंपनी एखादा फोन लाँच केल्यानंतर काही वर्षांनी त्या फोनसाठी अपडेट घेऊन येणं बंद करते. याचाच अर्थ तो फोन एक्सपायर होतो किंवा End Of Life लिस्टमध्ये समाविष्ट होतो. अशा फोन्समध्ये सायबर अटॅक होण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या फोनसाठी जर आवश्यक सुरक्षा पॅच लाँच केला जात नसेल तर हॅकर्स तुमच्या फोनमध्ये अगदी सहज प्रवेश मिळवू शकतात. ज्यामुळे तुमच्या फोनमधील वैयक्तिक डेटा लिक होऊ शकतो.
एखादा स्मार्टफोन लाँच केल्यानंतर काही वर्षांनी कंपनी त्या स्मार्टफोनसाठी सॉफ्टवेअर अपडेट आणणं बंद करते. यामुळे त्या स्मार्टफोनचा वापर करणं कठीण होतं. नवीन अपडेट्स न आल्याने फोनची कार्यक्षमता बिघडते. तसेच फोनचे अपडेट बंद झाल्यानंतर कंपन्या काही वर्षांनी फोन अॅक्सेसरिज बनवणं देखील बंद करतात. अशा परिस्थितीत फोन End Of Life लिस्टमध्ये सहभागी झाला किंवा फोनची एक्सपायरी डेट जवळ आली आहे, असं आपण बोलू शकतो. जर एखादा स्मार्टफोन 2023 मध्ये लाँच करण्यात आला असेल तर त्याची एक्सपायरी डेट 2030 पर्यंत असू शकते. जोपर्यंत तुमच्या फोनला सिक्युरिटी अपडेट मिळत आहे, तोपर्यंत तुमचा फोन अगदी सुरक्षित आहे. मात्र सिक्युरिटी अपडेट मिळणं बंद झाल्यानंतर तुमच्या फोनमधील डेटा हॅक होण्याची शक्यता असते.