आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी केली. त्याच्या या खेळीचे भारताचे माजी दिग्गज खेळाडू योगराज सिंग यांनी भरभरून कौतुक केले आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यादरम्यान अनेक विक्रम मोडीत काढण्यात आले आहेत.