फोटो सौजन्य: Pinterest
किंमतीकडे पाहिले तर Tata Punch Turbo आणि Maruti Suzuki Fronx Turbo या दोन्ही एसयूव्ही वेगवेगळ्या बजेटला लक्षात घेऊन बाजारात आणण्यात आल्या आहेत. Tata Punch ची एक्स-शोरूम किंमत 5.59 लाख रुपये पासून सुरू होते, तर याच्या टर्बो व्हेरिएंट्सची किंमत सुमारे 8.29 लाख रुपये पासून 9.79 लाख रुपये पर्यंत आहे.
US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?
दुसरीकडे, Maruti Suzuki Fronx ची सुरुवातीची किंमत 6.85 लाख रुपये आहे, तर याच्या टर्बो टॉप व्हेरिएंट्सची किंमत सुमारे 8.91 लाख रुपये इतकी आहे. एकूण पाहता, Punch Turbo ही Fronx Turbo च्या तुलनेत सुमारे 1 ते 1.30 लाख रुपये अधिक स्वस्त ठरते. आता पाहूया इंजिन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत कोण पुढे आहे.
परफॉर्मन्सच्या दृष्टीने पाहिले तर Tata Punch Turbo अधिक ताकदवान वाटते. या कारमध्ये 1.2-लीटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 120 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन कमी RPM वरही उत्तम पिकअप देते, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक मजेशीर होते.
याच्या तुलनेत Maruti Suzuki Fronx Turbo मध्ये 1.0-लीटर Boosterjet टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, जे सुमारे 99 ते 100 PS पॉवर आणि 148 Nm टॉर्क देते. Fronx मध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध असला, तरी पॉवरच्या बाबतीत Punch Turbo स्पष्टपणे पुढे असल्याचे दिसते.
February 2026 मध्ये Honda कडून ग्राहकांना खास गिफ्ट! ‘या’ Cars वर लाखो रुपये वाचवण्याची संधी
मायलेजच्या बाबतीत मारुती सुझुकी फ्रॉन्क्स टर्बो आघाडीवर आहे. ARAI ने दावा केल्याप्रमाणे याच्या मॅन्युअल व्हेरिएंटचा मायलेज 21.5 kmpl आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट सुमारे 20 किमी प्रति लिटर मायलेज देतो. दुसरीकडे, टाटा पंच टर्बो वास्तविक इंधनाच्या बाबतीत 15 ते 18 किमी प्रति लिटर मायलेज देण्याची अपेक्षा आहे.






