दिल्लीत सरकारी शाळांमधील वर्गखोल्याच्या बांधकामात २००० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी एसीबीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या प्रमुखांना निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी 21 दिवसांचा दिलासा दिला आहे. तब्येत बिघडल्याचे सांगून केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवण्याची मागणी केली होती.
लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे 3 समन्स जारी केले आहेत.