फोटो सौजन्य: Pinterest
टाटा टियागो ही हॅचबॅक कार म्हणून ऑफर केली जाते. जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर दरमहा तुम्हाला किती EMI द्यावा लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
टाटा मोटर्स 4.57 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत टियागोचा बेस व्हेरिएंट ऑफर करते. ही कार खरेदी केल्यास, याची ऑन-रोड किंमत अंदाजे 5.10 लाख रुपयांपर्यंत जाते. यामध्ये 4.57 लाखाची एक्स-शोरूम किंमत, तसेच RTO साठी अंदाजे 26000 रुपये आणि विम्यासाठी अंदाजे 27000 रुपये समाविष्ट आहेत.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज मिळू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही सुमारे 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर उरलेली जवळपास 3.10 लाख रुपयांची रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून घ्यावे लागेल. बँक जर 9 टक्के व्याजदराने सात वर्षांच्या कालावधीसाठी हे कर्ज मंजूर करत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षे दरमहा फक्त 4,996 रुपयांचा EMI भरावा लागेल.
Hero Glamour 125 vs Honda Shine 125: इंजिन, किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक पुढे?
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 3.10 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर दरमहा 4,996 रुपयांचा EMI भरावा लागेल. सात वर्षांच्या कालावधीत तुम्ही या कर्जावर सुमारे 1.09 लाख रुपये व्याज भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याजाचा विचार करता, ही कार तुम्हाला एकूण सुमारे 6.19 लाख रुपयांपर्यंत पडू शकते.
भारतीय बाजारपेठेत टाटा टियागो Wagon R, Hyundai Grandd Nios i10,Maruti Alto K10, Celerio, आणि S Presso सारख्या हॅचबॅकशी थेट स्पर्धा करते.






