प्रशांत कोरटकरला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी (फोटो सौजन्य-X)
Lawyers attack Prashant Koratkar in Kolhapur court : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याच्यावर वकिलाने हल्ला केला आहे. कोल्हापूर न्यायालयात हा प्रकार झाला. प्रशांत कोरटकर याची पोलिस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयात आणण्यात आले होते. हल्ला करणारे वकील अमित भोसले असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला वकिलाने धडा शिकविण्याचा प्रयत्न केला. सुनावणी संपल्यानंतर पोलीस नेत असताना वकिलानं कोल्हापुरी पायताणानं त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याची कोल्हापूरसह राज्यभरात जोरादार चर्चा सुरू झाली आहे.
महिनाभर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर आज त्याची पोलीस कोठडी संपली. कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात कोरटकरला हजर करण्यात आले. न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर न्यायालयाच्या परिसरातील कॅन्टीनजवळ दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एका वकिलानं छत्रपतींचा अवमान करतोस का? असा कोरटकरला जाब विचारला. त्यावेळी वकिलानं कोरटकरवर कोल्हापुरी पायताणानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित असलेल्या पोलिसांनी हल्ला करणाऱ्या वकिलाला पकडलं. यानंतर कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिलेल्या नागपूरस्थित प्रशांत कोरटकरला 25 मार्च रोजी कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातून अटक केली. त्यानंतर एका महिन्यानंतर आरोपीला कोल्हापूरला आणण्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. न्यायालयाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या लोकांचा तीव्र रोष पाहून कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोल्हापूर न्यायालयात तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला न्यायालयानं आज 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सरकारी वकील हेमा काटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. कोल्हापुरातील शिवभक्तांनी आज सकाळी कोरटकर विरोधात निदर्शने केली. यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क होती. त्यामुळे कोरटकर हा कोल्हापूरच्या पायताणचा मार खाण्यापासून थोडक्यात बचावला आहे.