थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात वेगवेगळ्या बेरीज उपलब्ध असतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणले मलबेरीज. आंबटगोड चवीची मलबेरीज शरीर आणि त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये लोह, विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मलबेरीज खावी. यामध्ये असलेले नैसर्गिक गोडवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मलबेरीज खाल्ल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
हृदय आणि त्वचेसाठी वरदान ठरेल मलबेरीज, लहान आकाराच्या नाजूक फळाचे शरीराला होतील भरमसाट फायदे

मधुमेह असलेल्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास कोणत्याही मिठाईचे सेवन करण्याऐवजी मलबेरीज खाव्यात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि आरोग्य सुधारते.

मलबेरीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळते. पचनाचे विकार दूर करण्यासाठी मलबेरीज खावी.

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मलबेरीजचे सेवन करावे. यामध्ये असलेले विटामिन सी शरीराला भरपूर पोषण देते.

मलबेरीमध्ये अँथोसायनिन्स आणि अनेक अँटिऑक्सिडंट्स ज्यामुळे शरीरातील कॅन्सरच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते. शरीरातील मुक्त रॅडिकल्स नष्ट कॅन्सरच्या पेशी अजिबात वाढत नाही.

मलबेरीजमध्ये असलेल्या कॅल्शियम, लोह आणि विटामिन ए मुळे हाडे मजबूत राहतात आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे आहारात स्ट्रॉबेरी, मलबेरीज यांसारख्या वेगवेगळ्या बेरीजचे सेवन करावे.






