स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती आहे (फोटो - सोशल मीडिया)
स्वराज्याचे तिसरे राजे छत्रपती राजाराम महाराज यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र असलेले राजाराम महाराज यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१ या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजधानी किल्ले राजगडावर झाला. छत्रपती संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुरा हाती घेतली. छत्रपती राजाराम आणि त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार पाहिला व तो काळ गाजविला. राजाराम महाराजांचे यांचे नाव इतिहासामध्ये अजरामर राहिले. (Dinvishesh)
24 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
24 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष






