सोफी डेव्हिन(फोटो-सोशल मीडिया)
Gujarat Giants buy Sophie Devine for ₹2 crore :महिला प्रीमियर लीग २०२६ चा मेगा लिलावाची सर्वच क्रिकेट चाहते फारच उत्सुकतेने वाट पाहात होते. सोशल मिडियावर देखील WPL ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. अखेर हा मेगा लिलाव सुरू झाला आहे. २०२६ महिला प्रीमियर लीगचा मेगा लिलाव गुरुवारी नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे. या WPL मेगा लिलावात एकूण २७७ खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान सोफी डेव्हिन या खेळाडूला, ज्याची मूळ किंमत ₹५० लाख होती. तिला गुजरात जायंट्सने २ कोटींना खरेदी केले आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ चा मेगा लिलावामध्ये आघाडीच्या खेळाडूंमध्ये पहिले नाव ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीचे होते. तिची मूळ किंमत ₹५० लाख होती. परंतु, तिला आतापर्यंत, तिला कुणी खरेदी केले नाही. सोफी डेव्हिनसाठी गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढाई झाली. दिल्ली कॅपिटल्सने किंमत वाढवली, परंतु गुजरातनेही काळजीपूर्वक विचार केल्यानंतर किंमत वाढवून पुढे गेले. त्यानंतर दिल्ली आणि गुजरात यांच्यात लढाई झाली आणि अखेर गुजरात जायंट्सने सोफीला ₹२ कोटींना आपल्या संघासाठी करारबद्ध केले.
हेही वाचा : “गौतम गंभीर हाय हाय…!” चाहत्यांच्या संतापात मोहम्मद सिराजने आपल्या प्रशिक्षकासाठी केले असे काही; Video Viral
एक लक्षात घेण्यासारखे आहे की, यावेळी लिलावात एक मोठा नवीन नियम जोडला गेला आहे. संघ RTM (राईट टू मॅच) कार्ड वापरू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या २०२५ च्या संघातील खेळाडू परत विकत घेता येणार आहे. कमी खेळाडू राखणाऱ्या फ्रँचायझींना अधिक RTM कार्ड आणि मोठी पर्स मिळणार आहे. यावेळी लिलावासाठी एकूण पर्स ४१.१ कोटी रुपये आहे.
भारताची स्टार महिला फलंदाज स्मृती मानधना आणि मंगेतर पलाश मुच्छल यांचे २३ नोव्हेंबर रोजी लग्न पार पडणार होते. या जोडीचे हळदी आणि संगीत समारंभ देखील पार पडले होते. परंतु, लग्नाच्या फक्त एक दिवस आधी अचानक स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि समारंभ पुढे ढकलण्यात आला. यावरून सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान रॉड्रिग्जने मोठा निर्णय घेतला आहे. रॉड्रिग्ज सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीग हंगामात ब्रिस्बेन हीट संघाचा भाग होती. परंतु, तिने मानधनाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी स्पर्धा अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता मानधनाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, तिने मानधनासह राहण्याचा निर्णय घेतला आहे. WBBL फ्रँचायझीने तिच्या निर्णयाचा आदर केला आहे.






