अलीकडच्या काळात डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. पूर्वी, वधूला तिच्या वडिलोपार्जित घरातून निरोप दिला जात होता, परंतु आता लग्न एका विशिष्ट ठिकाणी आयोजित केले जाते, याला डेस्टिनेशन वेडिंग असे म्हणतात. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा ट्रेंड स्वीकारला आहे. उदयपूर, गोवा, हैदराबाद, जयपूर आणि जोधपूर ही शहरे भारतातील डेस्टिनेशन वेडिंगसाठी खूप लोकप्रिय आहेत.
ही शहरे त्यांच्या सौंदर्याने आणि शाही भव्यतेने जगभरातील लोकांना आकर्षित करतात. तथापि, या ठिकाणी लग्न करणे थोडे महाग असू शकते. पण काळजी करू नका, तुमचे बजेट मर्यादित असले तरी, तुम्ही भारतातील अनेक सुंदर ठिकाणी परवडणारे डेस्टिनेशन वेडिंग करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही बजेट फ्रेंडली वेडिंग डेस्टिनेशन विषयी माहिती देत आहोत. लग्नासाठी तुम्ही या ठिकाणांचा नक्कीच विचार करू शकता.
हेदेखील वाचा – वेटिंग तिकीट कॅन्सल करूनही पैसे परत मिळत नाहीयेत? मग अशी तक्रार करा, त्वरित मिळेल रिफंड
पुष्कर, राजस्थान
जर तुम्ही शाही लग्नाचे स्वप्न पाहत असाल तर राजस्थानमधील पुष्क असले तरी, तुम्ही भारतातील अनेक सुंदर ठिकाणी परवडणारे डेस्टिनेशन वेडिंग करू शकता. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही बजेट फ्री ठिकाणांविषयी माहिती देत आहोत. लग्नासाठी तुम्ही या ठिकाणांचा नक्कीच विचार करू शकता. अरावली पर्वतांनी वेढलेले हे प्राचीन शहर आपल्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासासाठी ओळखले जाते. पुष्करमध्ये अनेक ऐतिहासिक वाडे आणि राजमहल आहेत जे तुमच्या लग्न समारंभाला शाही थाट देतील. यावरील नक्षीदार काम, रंगीबेरंगी दार आणि रेखीव कलाकृत्या तुमच्या लग्नसमारंभाला आणखीन स्पेशल बनवतील.
अलिबाग, महाराष्ट्र
जात तम्ही समुद्रकिनाऱ्यावर आलिशान लग्नाचे स्वप्न पाहत असाल पण गोव्याचे बजेट तुमच्यासाठी थोडे वाटत असेल तर यामुळे निराश होण्याची अजिबात गरज नाही, मुंबईपासून अवघ्या 2 तासांच्या अंतरावर असलेले अलिबाग तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. अलिबाग हे मुंबईच्या गजबजाटापासून दूर असलेले शांत आणि सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्हाला सुंदर समुद्रकिनारे, पाम ट्री आणि गोव्यासारख्या निळ्याशार समुद्राचे दृश्य पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर मुंबईसारख्या शहरी सुविधाही तुम्हाला मिळतील. मुंबईहून अलिबागला जाणे खूप सोपे आहे. तुम्ही येथे बस, ट्रेन किंवा वैयक्तिक कारने देखील येऊ शकता.
हेदेखील वाचा – गुजरातमध्ये पाहायला मिळेल भारतातील पहिली बुलेट ट्रेन, विमानतळालाही लाजवेल असा फर्स्ट लूक, पाहून व्हाल हैराण
अलेप्पी, केरळ
अलेप्पीचे शांत आणि रोमँटिक वातावरण तुमच्या डेस्टिनेशन वेडिंगची रंगत आणखीन वाढवेल. येथील कालवे, बॅकवॉटर आणि हिरवीगार नारळाची झाडे तुम्हाला व्हेनिस शहराची आठवण करून देतील. अलेप्पीमध्ये तुम्ही हाऊसबोटीत बसून तुमचा विवाहसोहळा साजरा करू शकता. या जागेचा अनुभव तुम्ही कधीही विसरू शकणार नाही असा सुस्मर्णीय राहील.