भारतात रेल्वेचे फार मोठे जाळे आहे. हे रेल्वेचे जाळे किती वेगाने विकसित होत आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. आधी वंदे भारत आला, मग अमृत भारत एक्स्प्रेस सुरू झाली, त्यानंतर आणखी अनेक गाड्या सुरू झाल्या, त्या पाहता रेल्वेचा आधुनिक वेग कोणीही रोखू शकत नाही, असे वाटते. चांगली बातमी म्हणजे आता काही वर्षातच बुलेट ट्रेनदेखील भारतात येणार आहे. वेग वाढल्याने आता त्याच्या स्टेशनवरही काम सुरू आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो, यासाठी स्टेशन आधुनिक आणि चांगल्या सुविधांनी सुसज्ज केले जात आहे, जेणेंकरून प्रवाशांना स्टेशनवर तिकट, वेटींग काउंटर, तिकीट, वेटिंग काउंटर, बिझनेस क्लास लाउंज, नर्सरी, टॉयलेट आणि सूचना कक्ष यांसारख्या सर्व सुविधा मिळू शकतील. ट्रेनमध्ये आणखीन काही सुविधा दिल्या जाणार आहेत. चला तर सुविधांविषयीच सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – हे देश जगाच्या नकाशावर कधीही दिसणार नाहीत, त्यामागचे कारण काय ते जाणून घ्या
या स्टेशनची खासियत म्हणजे, हे रेल्वे स्टेशन इतर स्टेशनपेक्षा पूर्णपणे वेगळे असणार आहे. बुलेट ट्रेनच्या एकूण 12 स्थानकांवर 90 एस्केलेटरही बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना सामानासह जिने चढताना आणि उतरताना कोणतीही अडचण येऊ नये.
Terminal for India’s first bullet train!
📍Sabarmati multimodal transport hub, Ahmedabad pic.twitter.com/HGeoBETz9x
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 7, 2023
इथे 12 स्टेशन बनवले जातील
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते अहमदाबाद दरम्यान संपूर्ण 508 किमी लांबीच्या बुलेटवर काम सुरू आहे. पुढील वर्षी डिसेंबर 2026 पर्यंत हे सुरु होण्याची अपेक्षा आहे. यासाठी महाराष्ट्र, गुजरात, दिव-दमणमध्ये सुविधा देण्याचे काम सुरु आहे. अशा स्थितीत एकूण 12 स्थानके बांधली जाणार असून त्यापैकी 8 गुजरात आणि 4 महाराष्ट्रातील असतील.
हेदेखील वाचा – World Last Road: फार धोकादायक आहे हा जगातील ‘अंतिम रस्ता’… या शेवटच्या टोकाला मृत्यू पाहते वाट!
बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स
ठाणे
विरार
बोइसर
वापी
बिलिमोरा
सूरत
भरूच
बड़ौदा
आनंद
अहमदाबाद
साबरमती स्टेशन
रिपोर्ट्सनुसार, यात गुजरातमधील 8 स्थानकांवर 48 एस्केलेटर आणि महाराष्ट्रातील 4 स्थानकांवर 42 एस्केलेटर बनवण्यात येणार आहेत. ही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पाण्याखालून धावणार आहे.